नांदेड जिल्ह्यात झालेली केळी लागवड
नांदेड जिल्ह्यात झालेली केळी लागवड 
मुख्य बातम्या

नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत होणार केळी लागवड क्षेत्रात घट 

टीम अॅग्रोवन

नांदेड  : गतवर्षीची दुष्काळी स्थिती आणि यंदाच्या पावसाळ्यात आजवर पुरेसा पाऊस न झाल्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे यंदा नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील मृगबाग केळीच्या लागवड क्षेत्रात घट होणार आहे. येत्या काळात पाण्याच्या उपलब्धतेवर केळी लागवडीचे भवितव्य अवलंबून आहे. पाणी उपलब्ध झाले तर सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत कांदेबाग केळी लागवड होऊ शकेल.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळीचे क्षेत्र १६ ते १८ हजार हेक्टरपर्यंत आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नांदेड या तालुक्यांसह हदगाव, भोकर या तालुक्यांतील काही भागांत केळीचे लागवड क्षेत्र आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, पाथरी, मानवत तालुक्यात केळीचे क्षेत्र आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी तालुक्यात केळी लागवड केली जाते. जून ते जुलै या कालावधीत मृगबाग केळीची लागवड केली जाते. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती असल्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे केळी लागवडीखालील क्षेत्रात दरवर्षी घट होत आहे.

गतवर्षी नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक पट्ट्यात पाणी उपलब्ध होते. त्यामुळे मृगबाग केळी लागवड झाली होती. इसापूर धरणाच्या कालव्याचे पाणीदेखील यंदाच्या उन्हाळ्यापर्यंत मिळाले होते. यंदा अद्याप इसापूर धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. विहिंरीनादेखील पाणी नाही. त्यामुळे केळी लागवडीचे प्रमाण कमी आहे. मुबलक पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी केळी लागवड केली असली तर क्षेत्र कमी केले आहे.

इसापूर कालव्याच्या पाण्याचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा, गिरगाव, कुरुंदा या भागांतील केळी उत्पादकांना झाला. परंतु सिंचनासाठी पाणी पुरसे असूनसुद्धा तापमानवाढीमुळे केळी होरपळल्याने उत्पादकांचे नुकसान झाले. मृगबाग केळी लागवडीचा कालावधी संपला आहे. त्यामुळे केळीच्या क्षेत्रात घट होणार आहे.

प्रतिक्रिया

दरवर्षी केळी लागवड करत असतो. गतवर्षी सहा एकरांवर लागवड केली होती. परंतु पाणी कमी पडल्याने चार एकरावरील केळीची झाडे मोडून टाकली. पाणी नसल्यामुळे केळी लागवड करता येत नाही.  - माणिकराव सूर्यवंशी, सिंगणापूर, जि. परभणी

जुन-जुलै महिन्यांत मृगबाग केळीची लागवड केली जाते. परंतु यंदा पाऊसमान कमी आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे केळी लागवड क्षेत्रात घट होणार आहे. येत्या काळात पाणी उपलब्ध झाले तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कांदेबाग केळी लागवड होऊ शकेल. - प्रा. आर. व्ही. देशमुख, प्रभारी अधिकारी, केळी संशोधन केंद्र, नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT