पोलीस बंदोबस्तात `माळेगाव`चा पदभार बाळासाहेब तावरेंकडे 
पोलीस बंदोबस्तात `माळेगाव`चा पदभार बाळासाहेब तावरेंकडे  
मुख्य बातम्या

पोलीस बंदोबस्तात `माळेगाव`चा पदभार बाळासाहेब तावरेंकडे 

सकाळ वृत्तसेवा

माळेगाव, जि. पुणे : साखर आयुक्तांच्या आदेशान्वये `माळेगाव`चे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांनी कारखाना प्रशासकीय पदभार रविवारी (ता.५) स्वीकारला. विशेषतः ही प्रक्रिया पूर्णत्वाला येईपर्यंत पोलिसांनी कारखाना कार्यस्थळावर मोठा बंदोबस्त ठेवला होता. मावळते अध्यक्ष रंजन तावरे यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३० एप्रिलपर्यंत माझ्या संचालक मंडळाचा कार्यकाळ आहे, असा दावा केल्याने सत्ताधारी व विरोधकात परस्परविरोधी तणाव निर्माण झाली होता. 

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये (२५ फेब्रुवारी २०२०) राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनल १७ विरुद्ध ४ जागांच्या फरकांनी विजयी झाला होता. त्यानुसार ८ मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी शहाजीराज हिरे यांनी नवनिर्वाचित संचालकांच्या घेतलेल्या बैठकीत बाळासाहेब तावरे यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी तानाजी कोकरे यांची बिनविरोध निवड झाली होती. परंतु मावळते अध्यक्ष रंजन तावरे यांच्या संचालक मंडळाचा पाच वर्षाचा कार्यकाळ (४ एप्रिल) संपेपर्यंत त्यांच्या कारभारात कोणीही हस्तक्षेप करता येणार नाही, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. तावरे, उपाध्यक्ष श्री. कोकरे यांना आपला कार्यभार घेण्यासाठी एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागली. 

दरम्यान, अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावर सर्वाधिक काळ (१४ वर्षे) काम केल्याची नोंद आहे. साखर धंद्यातील अनुभव व संचालकांच्या सहकार्याने सभासदांना सर्वाधिक ऊस दर देण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यासाठी शरद पवार, अजित पवार यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरेल, असे तावरेंनी सांगितले. यावेळी संचालक केशवराव जगताप, मदनराव देवकाते, अनिल तावरे, योगेश जगताप, नितीन सातव, सुरेश खलाटे, राजेंद्र ढवाण, स्वप्निल जगताप, संगिता कोकरे, तानाजी देवकाते आदींनी शिल्लक उसाबाबत आक्रमक भूमिका मांडली.  ......  उर्वरित उसाचे गाळप करणार...!  माळेगाव कार्यक्षेत्रात अद्याप १ लाख टन ऊस गाळपाअभावी उभा आहे. कोरोना व्हायरसचा धोका, वाढती उष्णता, ऊस तोडणी मजुरांना घरी जाण्याची ओढ विचारात घेता शिवारातील उभ्या उसाची चिंता शेतकऱ्यांना आहे. त्यानुसार अध्यक्ष बाळासाहेब तावरेंनी लागलीच संचालक व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उर्वरित ऊस गाळप उरकण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT