`Awareness among farmers for revised recommendations`
`Awareness among farmers for revised recommendations` 
मुख्य बातम्या

`सुधारित शिफारशींसाठी शेतकऱ्यांमध्ये जागृतीची गरज`

टीम अॅग्रोवन

परभणी ः ‘‘सोयाबीन उत्पादकता वाढ तसेच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सुधारित शिफारशींची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याची गरज आहे,’’ असा सूर कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या बैठकीत उमटला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधन संचालनालयाच्या सभागृहात गुरुवारी (ता.२५) सन २०२१-२२ च्या खरीप हंगाम सोयाबीन पीक नियोजन आढावा बैठक झाली. कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोनोने, कृषी उपसंचालक पांडुरंग शिगेदार, शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळेसे (परभणी), डी. एस. गवसाने (लातूर), यु. आर. घाटगे (उस्मानाबाद), सोयाबीन पैदासकार डॉ. शिवाजी मेहेत्रे, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे, सगरोळी केव्हीकेचे प्रमुख डॉ. सुरेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

राज्यातील सोयाबीनच्या क्षेत्रात विविध कारणांनी वाढ झाली आहे. खरीप क्षेत्राच्या साधारणतः ३० टक्के क्षेत्र सोयाबीनचे आहे. उत्पादकता वाढीसाठी दर्जेदार बियाण्याची उपलब्धता, बीज प्रक्रिया, पेरणीसाठी बियाणे वापराचे प्रमाण, खत व्यवस्थापन, कीड, रोग व्यवस्थापन, खंडकाळात पाणी व्यवस्थापन, जोखीम कमी करण्यासाठी आंतरपीक  पध्दतीचा अंगीकार या बाबी महत्त्वपूर्ण आहेत. काढणीसाठी मजुरांच्या समस्येमुळे यांत्रिकीकरणावर भर द्यावा लागेल, असा चर्चेचा सूर राहिला. 

पाटील म्हणाले, ‘‘सोयाबीनचे राज्यातील  क्षेत्र गतवर्षी ४३.५७ लाख हेक्टर होते. तर सरासरी प्रतिहेक्टरी उत्पादकता १४.२४ क्विंटल आली. येत्या काळात  उत्पादकता वाढीसाठी दर्जेदार बियाण्यासह बिजप्रक्रियेसाठी जैविक निविष्ठा, बीबीएफ तंत्रज्ञान पद्धतीने पेरणीचे फायदे, त्याचा अंगीकार येणाऱ्या अडचणी सोडविणे आवश्यक आहे.’’ 

घाटगे म्हणाले, ‘‘एकरी बियाणे वापराचे प्रमाण कमी करण्याची शिफारस  करावी. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल.’’

डॉ. मेहेत्रे म्हणाले, ‘‘उत्तम दर्जाचे बियाणे पुरेशा प्रमाण उपलब्ध करून द्यावे लागेल. खासगी बियाणे उत्पादकांचा तंत्रज्ञान प्रकारातील सहभाग वाढवावा लागेल. ७०० ते १००० मिमी पाऊस झाल्यास तसेच २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान असल्यास सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळते.’’

चर्चेतील ठळक मुद्दे

  •   सोयाबीनच्या क्षेत्रवाढीची कारणे
  •   कमी उत्पादकतेची कारणे 
  •   पीक पेरणीचा योग्य कालावधी
  •   पेरणीसाठी बियाणे मात्रा
  •   बिजप्रक्रिया
  •   बिया न उगवण्याची कारणे
  •   आंतरपीक पद्धती
  •   अन्नद्रव्य व्यवस्थापन
  •   तण व्यवस्थापन
  •   पाणी व्यवस्थापन
  •   काढणी तंत्रज्ञान
  •   काढणीपश्चात बियाणे साठवणूक
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    SCROLL FOR NEXT