करंजी येथील केंद्रावर धान खरेदीस टाळाटाळ
करंजी येथील केंद्रावर धान खरेदीस टाळाटाळ 
मुख्य बातम्या

करंजी येथील केंद्रावर धान खरेदीस टाळाटाळ

टीम अॅग्रोवन

चंद्रपूर  ः गोंडपिपरी तालुक्‍यातील करंजी येथील केंद्रावर धान खरेदीस टाळाटाळ होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या केंद्रावर धान खरेदी सुरू व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे केली आहे.  गोंडपिपरी उपविभागाचे आदिवासी विकास महामंडळालाही या विषयावर निवेदन देण्यात आले. त्यानुसार, राज्य सरकारने धानाला १८१५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला. त्यानंतर ५०० रुपये बोनस आणि २०० रुपये अनुदान याप्रमाणे ७०० रुपये वाढीव देण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनालाच धान विक्रीचा निर्णय घेतला. करंजी आदिवासी विविध सहकारी संस्थेमार्फत धान खरेदी सुरू करण्यात आली. या संस्थेअंतर्गत करंजी, आक्‍सापूर, जोगापूर, धानापूर, गणपूर, कन्हाळगाव या गावांचा समावेश होतो. या गावातील शेतकरी रोजच करंजी येथे जाऊन धान विक्रीबाबत विचारणा करतात. मात्र, या केंद्रावर खरेदी करण्यासंबंधीचा फक्‍त फलक झळकत असून हे केंद्र नेहमीच बंद राहते. परिणामी या केंद्रावर धान खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना गेल्या पावली परतावे लागते.  केंद्रप्रमुख सुरेश भसारकर यांच्याशी काही शेतकऱ्यांनी मोबाईलवरून संपर्क साधला. त्या वेळी त्यांनी गोदाम धानामुळे भरल्याने खरेदी करणे शक्‍य नसल्याचे उत्तर दिले. परंतु, वास्तविकता करंजी संस्थेमार्फत येणाऱ्या गावांमध्ये मोजक्‍याच शेतकऱ्यांकडील धान खरेदी करण्यात आली. तितक्‍याच खरेदीने गोदाम कसा भरला? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. त्यासोबतच परिसरात बारीक धान पिकत असल्याने गोदामात असलेला जाड धान आला कोठून? असा सवालही शेतकरी विचारत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून जाड धानाची खरेदी करून रातोरात गोदाम भरल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत; तसे निवेदनही शेतकऱ्यांनी दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT