Auction of vegetables and fruits in the evening in the town
Auction of vegetables and fruits in the evening in the town 
मुख्य बातम्या

नगरला सायंकाळीही भाजीपाला, फळांचे लिलाव

टीम अॅग्रोवन

नगर : मुंबई, पुण्यातील बाजारात भाजीपाला, फळांची विक्री करण्यासाठी शेतकरी आणि खरेदीदारांना सोपे व्हावे यासाठी आता नगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत सायंकाळीही भाजीपाला, फळांचे लिलाव सुरू केले आहे. सभापती अभिलाष घिगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

शुक्रवारी (ता. २९) झालेल्या पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळला. सायंकाळी लिलाव सुरू केल्यामुळे अन्य ठिकाणाचे खरेदीदारही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजीपाला, फळांची खरेदी-विक्री आता नगर शहरातील बाजाराएेवजी नेप्ती उपबाजारात होणार आहे.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नगर शहरात भाजीपाला, फळे, फुलांचे लिलाव होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे बाजार समितीत व्यवहार बंद होते. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी भाजीपाला, फळांची शेतकरी ते छोटे खरेदीदारांना विक्री सुरू होती. शहरात गर्दी होत असल्याने भीजापाला, फळांचा बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात नेला. नगर येथे बाजार समितीत जिल्ह्यासह शेजारील मराठवाड्यातून भाजीपाला, फळे विक्रीसाठी येतात.

येथे येणारा साधारण चाळीस टक्के माल अन्य मोठ्या बाजारात विकला जातो. मात्र, येथील खरेदीदारांना मुंबई, पुणे, नाशिक व अन्य मोठ्या बाजारात फळे, भाजीपाला नेण्यासाठी सोपे जावे म्हणून शेतकरी व खरेदीदार यांच्या आग्रहास्तव दररोज संध्याकाळी सहा ते रात्री १२ या वेळेत भाजीपाला, फळांचे लिलाव सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यानुसार आता सायंकाळीही नगरला भाजीपाला, फळांची खरेदी, विक्री सुरू राहणार असल्याबाबत बाजार समिती प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रोज पहाटे चार ते सकाळी आठ व सायंकाळी सहा ते बारा या वेळेत भाजीपाला व फळांची शेतकऱ्यांना विक्री करता येणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील इतर प्रमुख बाजारपेठांत म्हणजेच पुणे, मुंबई, कल्याण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद या ठिकाणी शेतमाल जास्तीत जास्त पाठवता येईल. यामुळे शेतकऱ्यांच्या मालालाही बाजारभाव जास्त मिळेल. तसेच शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त शेतीमाल विक्रीस आणता येईल. त्याबरोबर वाहतूक खर्चातही बचत होईल, असा विश्वास बाजार समिती प्रशासनाला आहे. सायंकाळी लिलाव सुरू ठेवण्याबाबत निर्णय झाला. त्यावेळी समितीचे उपसभापती संतोष म्हस्के, संचालक हरिभाऊ कर्डिले, रेवणनाथ चोभे, संतोष कुलट, दिलीप भालसिंग उपस्थित होते.

नगर बाजार समितीत राज्यभरातील अनेक भागातील भाजीपाला, फळांची आवक होत असते. मुंबई, पुणे व अन्य बाजार समितीत भाजीपाला, फळे नेण्यासाठी सोपे व्हावे यासाठी सायंकाळी लिलाव सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खरेदीदार, विक्रेते, शेतकरी यांची अडचण दुर होणार आहे. - अभय भिसे, सचिव, दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार बाजार समिती, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT