Assistance to flood victims Will be done: Thorat
Assistance to flood victims Will be done: Thorat 
मुख्य बातम्या

अतिवृष्टीग्रस्तांना सहकार्य करण्यात येईल ः थोरात

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : ‘‘अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे सहकार्य केले जाईल,’’ असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी (ता.३०) स्पष्ट केले.

विभागीय आयुक्त यांच्या दालनात आयोजित आढावा बैठकीत थोरात बोलत होते. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.  नागरिकांना कुठल्याही प्रकारे अडचणी भासू देऊ नयेत, अशी सूचनाही थोरात यांनी केली. या वेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, अपर आयुक्त आबासाहेब बेलदार, अविनाश पाठक, उपायुक्त पराग सोमण, जगदीश मिनीयार, पांडुरंग कुलकर्णी, वामन कदम, सहायक आयुक्त शिवाजी शिंदे, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे आदी उपस्थित होते.

थोरात यांनी प्रारंभी मराठवाडा विभागातील कोरोनाची स्थिती, पाऊस, धरणातील उपलब्ध पाणीसाठा, पेरणी, अतिवृष्टीने झालेले नुकसान, गौणखनिज या बाबतचा सविस्तर आढावा घेतला. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी व्यवस्थित नियोजन करण्याबाबत सूचित केले. कोरोना लसीचा पुरेसा साठा दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

सात-बारा संगणकीकरणाचा आढावा

सात-बारा संगणकीकरण, ई-फेरफार यांचा देखील थोरात यांनी आढावा घेतला. वाळू लिलावाच्या संबंधित अडचणी सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत प्रस्ताव द्यावेत, असे त्यांनी सूचित केले. प्रारंभी केंद्रेकर यांनी विभागात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केलेल्या उपाययोजना, ऑक्सिजन, व्हेटिंलेटर, बेडची  उपलब्धता, पाऊस, पेरणी, ई-पीक पाहणी, सात-बारा संगणकीकरण, ई-फेरफार, वाळू लिलावबाबत  सविस्तर माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

SCROLL FOR NEXT