विधानसभेचा बिगुल वाजला
विधानसभेचा बिगुल वाजला 
मुख्य बातम्या

विधानसभेचा बिगुल वाजला

टीम अॅग्रोवन

मुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार, २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान होणार आहे, तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी गुरुवारी २४ ऑक्टोबर २०१९ रोजी निकाल हाती येणार आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वीच राज्यात राजकीय फटाके फुटणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने नवी दिल्लीत शनिवारी (ता. २१) पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रातील २८८ आणि हरियाणातील ९० विधानसभेच्या जागांसाठी निवडणुकांचे वेळापत्रक घोषित करण्यात आले. दोन्ही राज्यांत एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकूण ८.९४ कोटी मतदार आहेत. राज्यात १.८४ लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जाणार आहेत. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत विशेष सुरक्षा पथक तैनात करण्यात येणार आहेत. तर राज्यभरातील सर्व पोलिंग बूथवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. दिव्यांग आणि वृद्धांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  मुंबई आणि सहकारी बँकांवर निवडणूक आयोगाची विशेष नजर असणार आहे. तसेच, महाराष्ट्रामध्ये दोन विशेष अधिकारी खर्च मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. उमेदवारांना प्रत्येकी २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे. त्याचसोबत उमेदवारांना तीस दिवसांचा हिशेब निवडणूक आयोगाला द्यावा लागणार आहे. प्रचारकाळात सोशल मीडिया आणि फेसबुकवर आयोगाचे संपूर्णपणे नियंत्रण असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी येत्या सोमवारी एक केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. प्रचारामध्ये प्लॅस्टिकच्या वापराला बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरणस्नेही सामग्रीचा वापर करणे उमेदवारांना बंधनकारक करण्यात आले आहे. २०१४ मध्ये विभागनिहाय कोणाला किती जागा मिळाल्या होत्या? पश्चिम महाराष्ट्र (७०)ः भाजप २४, शिवसेना १३, काँग्रेस १०, राष्ट्रवादी १९, इतर ०४ विदर्भ (६२)ः भाजप ४४, शिवसेना ०४, काँग्रेस १०, राष्ट्रवादी ०१, इतर ०३ मराठवाडा (४६)ः भाजप १५, शिवसेना ११, काँग्रेस ०९, राष्ट्रवादी ०८, इतर ०३ कोकण (३९)ः भाजप १०, शिवसेना १४, काँग्रेस ०१, राष्ट्रवादी ०८, इतर ०६ मुंबई (३६)ः भाजप १५, शिवसेना १४, काँग्रेस ०५, राष्ट्रवादी ००, इतर ०२ उत्तर महाराष्ट्र (३५)ः भाजप १४, शिवसेना ०७, काँग्रेस ०७, राष्ट्रवादी ०५, इतर ०२ एकूण (२८८)ः भाजप १२२, शिवसेना ६३, काँग्रेस ४२, राष्ट्रवादी ४१, इतर २०

२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल-  

भाजप १२२
    शिवसेना  ६३
काँग्रेस ४२
राष्ट्रवादी   ४१
बविआ   ०३
शेकाप   ०३
एमआयएम   ०२
वंचित/भारिप   ०१
माकप   ०१
मनसे    ०१
रासप  ०१
सपा  ०१
अपक्ष  ०७
एकूण   २८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT