जांभूळ
जांभूळ 
मुख्य बातम्या

आवक वाढूनही जांभळाला चांगला दर

टीम अॅग्रोवन
पुणे  ः गुलटेकडी येथील मार्केटयार्डात गुजरात राज्यातून जांभळाची आवक होत आहे. आवक वाढूनही चांगली मागणी असल्याने जांभळाला चांगला भाव मिळत आहे. रविवारी (ता. ६) जांभळाला प्रतिकिलाे ८० ते १०० रुपयांचा दर मिळाल्याची माहिती व्यापारी अजित घुले यांनी दिली. 
 
मार्केटयार्डात रविवारी गुजरात राज्यातील बोरसद आणि आणंद परिसरातून, तसेच पुणे जिल्ह्यातून २०० क्रेट जांभळाची आवक झाली. एका क्रेटमध्ये सुमारे १८ ते २० किलो जांभूळ असते. जांभळाचा हंगाम यंदा थोडासा उशिरा सुरू झाला असून, २० मेपर्यंत जांभळाची आवक होईल.
 
गेल्यावर्षी जांभळाला प्रतिकिलोस ६० ते ८० रुपये दर मिळत होता. यंदा त्यात २० रुपयांची वाढ झाली असून, घाऊक बाजारात ८० ते १०० रुपये दराने विक्री होत आहे. पोषक हवामामुळे पुणे जिल्ह्यात आणि गुजरातमध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे़.
 
मात्र, कोकणातील सावंतवाडी आणि कणकवली परिसरात मात्र जांभळाला फटका बसला असून, अवघे २५ टक्केच उत्पन्न निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरातच्या जांभळास मागणी वाढली आहे. हे जांभूळ चवीला गोड असून आकाराने मोठे आहे़. पुणे शहरातील घरगुती ग्राहकांसह विक्रेत्यांमधून मागणी आहे.

पुण्यात गेल्या आठ दिवसांपासून करवंदांचा हंगाम सुरू झाला आहे. रविवारी मार्केटयार्डात मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा परिसरातून ४० पाटी करवंदांची आवक झाली़. एका पाटीत ३० ते ४० किलो करवंदे असतात़. करवंदांना प्रतिकिलोस ५० ते ६० रुपये दर मिळत असल्याचेही व्यापारी अजित घुले यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chilli Cultivation : धाड परिसरात शेकडो हेक्टरवर यंदा झाली मिरचीची लागवड

Jharkhand Rain Update : झारखंडमध्ये अवकाळीचा कहर; वीज पडून पाच तर झाड कोसळून दोघांचा मृत्यू 

Water Agitation : हंडा घेऊन महिला धडकल्या सिंचन विभागाच्या कार्यालयावर

Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये मोठी चुरस

Liger Pesticide : ‘जीएसपी’चे कीटकनाशक ‘लायगर’ बाजारात

SCROLL FOR NEXT