custard apple, pomegranate
custard apple, pomegranate  
मुख्य बातम्या

मुंबई बाजार समितीत सीताफळ, डाळिंबाची आवक घटली

टीम अॅग्रोवन

मुंबई: सध्याच्या पावसाचा मोठा फटका राज्यातील कृषिक्षेत्राला बसत आहे. डाळिंब आणि सीताफळाचा हंगाम तेजीत असताना या पिकाला पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे डाळिंबावर काळे डाग पडून फळं खराब होऊ लागली आहेत. तर सीताफळेही गळून पडू लागली आहेत. त्यामुळे बाजारातील आवक घटली आहे. डाळिंब वर्षभर मिळत असले, तरी पावसाळ्यात त्यांचे उत्पादन अधिक चांगले असते. रोपांना चांगले पाणी मिळत असल्याने अगदी रसदार आणि टपोऱ्या दाण्यांची डाळिंबे या काळात पाहायला आणि खायला मिळतात. या काळात त्यांचे दरही कमी असतात. मात्र आता सलग पडणाऱ्या पावसाने मध्येच विश्रांती घेत पुन्हा हजेरी लावायला सुरुवात केली. त्यामुळे शेतात तयार झालेल्या डाळिंबावर पाणी पडून त्यावर काळे डाग पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे फळं खराब होत आहेत. डाग लागलेली फळे खरेदी करण्यास कुणी तयार होत नाही. आता बाजारात डाळिंबाची आवक कमी झाली आहे.  घाऊक बाजारात जेजुरी, नगर, सांगोला, सासवड येथून डाळिंबाची आवक होत असते. आता सासवडवरून आवक सुरू आहे. ही आवक मागच्या महिन्यापेक्षा कमी आहे. ५० ते १०० रुपये किलो असणारे डाळिंबाचे दर घाऊक बाजारात ५० ते १५० रुपये किलोवर गेले आहेत. हीच परिस्थिती सीताफळाच्या बाबतीतही आहे. घाऊक बाजारात सध्या सासवड, शिरुरमधून सीताफळांची आवक होत आहे. त्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. आकारानुसार सीताफळ ४० ते १०० रुपये किलो घाऊक बाजारात आहेत. त्यातही आकाराने मोठे असलेल्या गोल्डन सीताफळाची आवक अजून सुरु झालेली नाही. त्यामुळे सीताफळाचा हा हंगाम मंदीतच असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

मागणी पूर्ण होत नाही आधीच बाजारात खरेदीदार कमी आहेत आता आवकही कमी होत आहे. आधीच कमी असणाऱ्या ग्राहकांची मागणी पूर्ण करता येईल इतका मालही बाजारात येत नसल्याने व्यापारी चिंताग्रस्त आहेत. यावर्षी चांगली फळे लागली असून चांगला माल बाजारात पाठवता येईल, असे निरोप अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना पाठवले होते, मात्र मध्येच आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पडले आहे. त्यामुळे बाजारात मंदीचे सावट कायम असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT