Arrange funds for unorganized workers
Arrange funds for unorganized workers 
मुख्य बातम्या

असंघटित कामगारांसाठी निधीची व्यवस्था करा; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

टीम अॅग्रोवन

मुंबई : कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला असल्याने त्यांना आर्थिक मदत करावी. असंघटीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी निधीची व्यवस्था करावी. घरी रहावे लागलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगारी वैद्यकीय रजा मिळावी. लघु, मध्यम उद्योग आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडून कर्जवसुली करण्यास बॅंकांना एक वर्ष प्रतिबंध करावेत आदी मागण्यांचे निवेदन विविध सामाजिक, राजकीय संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी (ता. २३) देण्यात आले आहे.

कॉम्रेड डॉ. अशोक ढवळे, मेधा पाटकर, डॉ. गणेश देवी, माजी खासदार राजू शेट्टी आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले आहे. 

निवेदनात म्हटले केले आहे की, संपूर्ण देश कोरोना साथीच्या आपत्तीला सामोरा जात असताना देशातील व विशेषत: राज्यातील असुरक्षित व असंघटित समूहांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेक सूचनाही या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोरोनाची लागण झाली आहे का हे पाहण्यासाठी जास्तीत जास्त व्यापक प्रमाणात जनतेच्या तपासणीची व्यवस्था करावी; विशेषतः सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे दिसत असलेल्या व्यक्तींची व्यापक आणि प्राधान्याने तपासणी करावी. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी ज्यादा आर्थिक तरतूद जाहीर करावी. तपासणी, रुग्णालयात विशेष खाटा, विलगीकरण कक्ष, व्हेंटीलेटर आणि मास्क सॅनिटायझर व इतर आवश्यक सुविधा पुरेश्या प्रमाणावर पुरवाव्यात. खासगी रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार करावेत. जनधन खाती असलेल्यांना आणि दारिद्र्य रेषेखालील लाभधारकांना तातडीने ५,००० द्यावेत. यासाठी केंद्र सरकारने राज्यांना पुरेसे आर्थिक साह्य करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT