लष्करी अळी
लष्करी अळी 
मुख्य बातम्या

तेलंगणातही आढळली लष्करी अळी

वृत्तसेवा

हैदराबाद ः लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने भारतासह आशिया खंडातील अन्नसुरक्षा धोक्यात आल्याचा इशारा अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) दिला आहे. भारतात कर्नाटक राज्यात पहिल्यांदा लष्करी अळी आढळली होती. त्या वेळी तज्ज्ञांनी यावर चिंता व्यक्त करून अळीचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजना केल्या होत्या. मात्र, कर्नाटकपाठोपाठ शेजारच्या तेलंगणा राज्यातही लष्करी अळी अाढळली आहे.  लष्करी अळीने २०१६ पासून आफ्रिका खंडात थैमान घातले. अनेक देशांतील पिकांचा फडशा या अळीने पाडला त्यामुळे या किडीला अतिशय घातक मानले जाते. ‘एफएओ’ने भारतालाही लष्करी अळीमुळे धोका असल्याचे सांगितले होते. हा धोका खरा ठरत कर्नाटकात सर्वप्रथम लष्करी अळी आढळली होती. त्यानंतर शेजारच्या तेलंगणा राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव आढळला आहे. ‘‘राज्यातील करिमनगर, कामारेड्डी, संगारेड्डी, मेडाक आणि गडवाल या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी लष्करी अळी आढळली आहे,’’ असे तेलंगणाचे कृषीचे मुख्य सचिव सी. पार्थसारथी यांनी सांगितले.     ‘‘सध्या या जिल्ह्यातील काही ठिकाणी केवळ मका पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. हा प्रादुर्भाव प्राथमिक पातळीवरच आहे. प्रादुर्भाव झालेल्या भागात तपासणीसाठी तज्ज्ञांचे पथक पाठविण्यात आले आहे. तसेच, ठिकाणी किडीचे आणि पिकाचे नमुने तपासण्यासाठी बॅंगलोरला पाठविण्यात आले आहेत. सोबतच किडीवर नियंत्रण आणण्यासाठी कीटकनाशक फवरणी आणि इतर घ्यावयाची काळजी या विषयी कृषी विभाग आणि कृषी तज्ज्ञांनी माहिती दिली आहे,’’ असेही सी. पार्थसारथी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

SCROLL FOR NEXT