Approved scarcity plan of Rs. 13. 70 crore in Parbhani district
Approved scarcity plan of Rs. 13. 70 crore in Parbhani district 
मुख्य बातम्या

परभणी जिल्ह्यात पावणेचौदा कोटींचा टंचाई आराखडा मंजूर

टीम अॅग्रोवन

परभणी ः जिल्ह्यातील ग्रामीण भागात येत्या जून पर्यंत उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवरील उपायोजनाअंतर्गंत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे ५८१ गावे आणि २४४ वाड्यांवर ८९६ उपाययोजनांवर १३ कोटी ७० लाख रुपये खर्चाचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे स्रोतांच्या विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. परंतु बेसुमार उपसा, नियोजनाअभावी होणारी पाण्याची नासाडी आदी कारणांमुळे अनेक गावांतील पाण्याच्या स्त्रोतांची पाणी पातळी खालावली आहे. 

४३९ गावे आणि २०० वाड्या टंचाईग्रस्त आहेत. त्यासह संभाव्य टंचाईग्रस्त गावे आदीचा आराखड्यात समावेश आहे. ५८ गावांत १८६ नवीन विंधन विहिरी प्रस्तावित आहेत. १०७ गावे आणि १६ वाड्यांवरील १२२ नळयोजनांची दुरुस्ती होईल.  ९५ गावे आणि २८ वाड्यांवर तात्पुरत्या पूरक नळयोजना सुरु केल्या जातील. एकूण २३ गावे आणि १० वाड्यांवर ३७ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे.

एकूण २३१ गावे आणि १३३ गावांतील ४२६ खासगी विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्याचे प्रस्तावित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT