Approval of pomegranate cultivation proposals from Rohyo
Approval of pomegranate cultivation proposals from Rohyo 
मुख्य बातम्या

‘रोहयो’तून डाळिंब लागवडीच्या प्रस्तावांना मंजुरी

टीम अॅग्रोवन

आटपाडी, जि. सांगली ः आटपाडी तालुक्‍यात तालुका कृषी विभागाने चालू आर्थिक वर्षामध्ये रोजगार हमी योजनेतून (रोहयो) विक्रमी ५४५ शेतकऱ्यांना ४३४ हेक्‍टर क्षेत्रावर डाळिंब लागवडीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. गेल्या पंधरा वर्षांतील विक्रमी मंजुरी आणि लागवड ठरली आहे. तालुक्‍यातून युरोपियन राष्ट्रांना डाळिंबाची निर्यात वाढू लागली आहे. टेंभूचे पाणी आल्यामुळे फळबागा लागवडीचे क्षेत्र वाढत चालले आहे.

आटपाडी तालुक्‍यात सध्या १५ हजार हेक्‍टरवर डाळिंबाचे क्षेत्र आहे. दरवर्षी नवीन लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत चालली आहे. दोन वर्षांपूर्वी आटपाडी तालुका कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी रोजगार हमी योजनेतून दाखल झालेल्या डाळिंब लागवडीच्या प्रस्तावांना मंजुरी देणे बंद केले होते. गेल्यावर्षी जेमतेम बारा हेक्‍टर क्षेत्राला मंजुरी दिली होती. तालुका कृषी अधिकारी पोपट पाटील गेल्या वर्षी रुजू झाले. यापूर्वीही त्यांनी तालुका कृषी अधिकारी म्हणून आटपाडीत काम केले होते. २०२० ते २१ मध्ये तालुक्‍यातून जवळपास ५५० शेतकऱ्यांनी नवीन डाळिंब लागवडीचे प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर केले होते.

यातील विक्रमी ५४५ शेतकऱ्यांच्या ४३७.५० हेक्‍टर क्षेत्राला रोजगार हमी योजनेतून डाळिंब लागवड करण्यास मंजुरी दिली आहे. ही मंजुरी गेल्या पंधरा वर्षांतील उच्चांकी ठरली आहे. यातील २५४ शेतकऱ्यांनी १९१ हेक्‍टर क्षेत्रावर आत्तापर्यंत लागवड पूर्ण केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची पूर्वतयारी सुरू आहे. याशिवाय कृषी विभागाने आंबा, चिकू, नारळ या फळबागा लागवडीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यासाठी हेक्‍टरी दोन लाख १७ हजार रुपये तीन वर्षात मिळतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT