शेतकरी सन्मान योजनेसाठी सात हजार लाभार्थींचे अर्ज पात्र
शेतकरी सन्मान योजनेसाठी सात हजार लाभार्थींचे अर्ज पात्र 
मुख्य बातम्या

शेतकरी सन्मान योजनेसाठी सात हजार लाभार्थींचे अर्ज पात्र

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद ः तालुक्‍यातील २४ गावांतून सात हजार २६१ लाभार्थींचे अर्ज पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित गावांतील कामही प्रगतिपथावर असल्याची माहिती तहसीलदार विजय राऊत यांनी दिली आहे. 

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक कुटुंबाला वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याचे परिपत्रक चार फेब्रुवारी २०१९ रोजी काढण्यात आले. त्यानुसार महसूल स्तरावर याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गावनिहाय पात्र लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. ज्या कुटुंबाकडे पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन आहे, अशा कुटुंबीयांची निवड पात्र लाभार्थी म्हणून केली जात आहे. उस्मानाबाद तालुक्‍यात १२८ गावे आहेत. यापैकी २४ गावांतील काम पूर्ण झाले आहे. २४ गावांत सात हजार २६१ लाभार्थी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. तसेच त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने अपलोड करण्याचे काम सुरू झाले आहे. 

उर्वरित गावातील लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. संबंधित गावातही लवकरच याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. एखाद्या कुटुंबात सरकारी, निमसरकारी सेवेत नोकरीला असेल तर त्या कुटुंबाला अपात्र ठरविले जात आहे. त्यासाठी गावस्तरावर नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान अपात्र ठरलेल्या शेतकरी कुटुंबाचीही यादी तयार केली जात आहे. त्यामुळे अशा कुटुंबाला अपात्रतेचे कारण लक्षात येणार आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बॅंकेतील खाते क्रमांक, आयएफसी कोड यांची नोंद घेतली जात आहे. शिवाय खातेदाराचे मराठी आणि इंग्रजीमध्ये नोंदणी करावी लागत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करीत असताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे महसूल कर्मचारी सांगत आहेत.

योजनेचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. २४ गावांतील काम पूर्ण झाले असून, पात्र लाभार्थी निवडले आहेत. उर्वरित गावांतही लवकरच पात्र लाभार्थी निवडले जातील. २४ गावांत सात हजार २६१ लाभार्थी पात्र ठरले आहेत.  - राजाराम केलूरकर, नायब तहसीलदार, उस्मानाबाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

Education Fund : रानमसलेच्या प्राथमिक शाळेसाठी ‘लक्ष्मी’कडून सव्वा कोटींचा निधी

Lake Conservation : जैवविविधतेच्या बळावर ‘त्या’ करतात तलावाचे संवर्धन

SCROLL FOR NEXT