देशातील सफरचंद उत्पादन वाढणार 
मुख्य बातम्या

देशातील सफरचंद उत्पादन वाढणार

वृत्तसेवा

नवी दिल्ली : यंदा वाढीस अनुकूल हवामान असल्यामुळे देशातील सफरचंद उत्पादन गेल्या वर्षापेक्षा जास्त राहील, असा अंदाज सूत्रांनी बुधवारी (ता. २९) वर्तविला आहे.

देशातील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या प्रमुख उत्पादक राज्यांसह अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मणिपूर आणि सिक्किम येथेही सफरचंदाचे उत्पादन घेतले जाते. रेड डिलिशियस, रॉयल डिलिशीयस, रीच रेड या सफरचंदांच्या वाणांचे मुख्यत्वे उत्पादन घेतले जाते. देशांतर्गत मागणीनुसार सध्या उत्पादन होत आहे; मात्र सरकारने उत्पादनवाढीचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यानुसार प्रयत्न केले जात आहेत. यंदा देशात २.३ दशलक्ष टन सफरचंद उत्पादन होण्याची शक्यता आहे. तरीही काही प्रमाणात आयातही शक्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जवळचे देश असलेल्या नेपाळ आणि बांगलादेशमध्ये सफरचंदाची निर्यातवाढ होण्याची शक्यता आहे, तर अमेरिकेतून आयातवाढ होईल, असा अंदाज आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT