पशुवैद्यकीय सेवा
पशुवैद्यकीय सेवा  
मुख्य बातम्या

पशुवैद्यकीय सेवा आता ॲपद्वारे

टीम अॅग्रोवन

पुणे ः पशुधनाला तातडीने आणि दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा आता ॲपद्वारे मिळणार असून, पशुवैद्यकीय दवाखान्यांमधील पारंपरिक पद्धतीने ठेवण्यात येणारी पशुवैद्यकीय सेवांच्या नोंदीची विविध १८ रजिस्टरदेखील आता बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.  पारंपरिक पशुवैद्यकीय सेवा आता ऑनलाइन आणि अत्याधुनिक करण्यासाठी विशेष ॲप विकसित करण्यात येत आहे. या ॲपद्वारे पशुपालक आणि शेतकऱ्यांनी आपल्याकडील विविध पशुधनाची नोंद करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या ॲपवर संबंधित पशुवैद्यकीय दवाखाना, आणि अधिकाऱ्यांची देखील नोंद असणार आहे. पशुधनाला झालेल्या आजाराची नोंद शेतकऱ्यांनी ॲपवर करावयची आहे. यानंतर संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी पशुधनावर उपचार करणार असून, केलेल्या उपचाराची नोंद या ॲपवर करणार आहे. यामुळे संबंधित पशुधनाच्या आजार केलेला औषधोपचार यांचा इतिहास तयार होणार आहे. यामुळे भविष्यात उपचार करताना, संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला आजाराची माहिती मिळणार आहे. तसेच, पशुधनाला अधिकच्या उपचारासाठी दवाखान्यात आणल्यानंतर व्यक्तींप्रमाणे त्यांची संगणकीय नोंद होणार असून, त्याला एक विशिष्ट कोड क्रमांक देण्यात येणार आहे. हा कोड त्या पशुधनाची ओळख असणार असून, भविष्यात कायमस्वरूपी सेव्ह असणार आहे, असेही आयुक्त मिश्रा यांनी सागितले. 

८० तालुक्यांसाठी मोबाईल हॉस्पिटल लवकरच  महाराष्ट्रातील दुर्गम भागात पशुवैद्यकीय सेवा तातडीने मिळण्यासाठी ८० तालुक्यांसाठी मोबाईल हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. यासाठी १२ कोटींचा निधी मंजूर असून, पीपीपी तत्त्वावर ही हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. यासाठी वाहनांची निवड प्रक्रिया सुरु असून, या वाहनांमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही आयुक्त मिश्रा यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

SCROLL FOR NEXT