Anil Deshmukh resigns as Home Minister
Anil Deshmukh resigns as Home Minister 
मुख्य बातम्या

अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली. सीबीआय चौकशी दरम्यान गृहमंत्री पदावर राहणे योग्य नसल्याच मत अनिल देशमुख यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडले. अनिल देशमुख यांच्या या निर्णयाला शरद पवार यांनीही सहमती दर्शविली. अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे याबाबतचा निर्णय घेतील. मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा नक्कीच स्वीकारतील, असेही नवाब मलिक म्हणाले.

वाझे यांच्यामार्फत महिन्याला १०० कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीरसिंग यांनी केला होता. पहिल्यांदाच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून थेट गृहमंत्र्यांवर वसुलीचा आरोप झाल्यामुळे अखेर सरकारला अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे. सचिन वाझे प्रकरण सुरुवातीला वाझे आणि काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित राहील, असे वाटत होते. मात्र, विरोधक सुरुवातीपासून या प्रकरणी देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत होते. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही त्यांनी हा विषय लावून धरला होता. अखेर देशमुखांच्या राजीनाम्याची वेळ सरकारवर आल्याने आघाडी सरकारवर नामुष्की ओढवली आहे

अनिल देशमुखांचे आरोप पोलिस दलातील बदल्यांसंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका सार्वजनिक कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर देशमुख म्हणाले होते की, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या रुटीन नाहीत. काही पोलिस अधिकाऱ्यांकडून चुका झाल्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे. देशमुख यांच्या या उत्तरानंतरच परमबीरसिंग यांनी लेटरबॉम्ब टाकला. लेटरबॉम्ब नंतर देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. आपल्या चुका झाकण्यासाठी हे आरोप केल्याचं ट्विट देशमुख यांनी केलं. परंतु, त्यांनी मीडियाच्या प्रतिनिधींना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT