अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भाव
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भाव 
मुख्य बातम्या

अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भाव

टीम अॅग्रोवन

अमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती मागणी असल्याने सोयाबीन दरातील तेजी दिलासादायक ठरली आहे. मात्र त्याचवेळी तूर व कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

गेल्या तीन ते चार वर्षांपासून दराच्या बाबतीत धक्‍के खात असलेल्या सोयाबीन उत्पादकांना यंदा हमीदरापेक्षा अधिक भाव मिळाला. त्यामुळे खुल्या बाजारात सोयाबीनच्या गाड्या दिसू लागल्या. गतवर्षी शासकीय केंद्रावर असलेली गर्दी यंदा नाही. त्याकडे पाठ फिरवत शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात सोयाबीन विक्रीसाठी आणले. सोयाबीनच्या दरात दररोज तीस ते ४० रुपयांनी चढउतार होत असले तरी दर हमीदराच्या खाली आले नसल्याची स्थिती आहे. अमरावती बाजारात सोयाबीनला कमाल ३६२८, तर किमान ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलचे दर मिळत आहेत. बाजारातील आवक तुलनेत कमी आहे. सरासरी आवक ४ हजार पोत्यांची आहे. तुरीची शासकीय खरेदी सुरू झाली आहे.

ऑनलाइन मुदत वाढविली असली तरी अनेक केंद्र अजूनही सुरू नाहीत. खुल्या बाजारात हमीभदरापेक्षा क्‍विंटलला ३७५ रुपयाने कमी दर तुरीला मिळत आहे. अमरावती बाजार समितीत ४४०० ते ५३०० रुपये क्‍विंटलने तुरीची खरेदी होत आहे. हमीभाव ५६७५ रुपये आहे. मात्र, शासकीय यंत्रणेची हवी तशी साथ मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. शासकीय केंद्र सुरू झाल्यास दर वाढतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. हरभऱ्याला किमान ४००० ते ४३५० रुपये क्‍विंटलचा दर मिळत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT