Amravati district needs Rs 742 crore for loan waiver
Amravati district needs Rs 742 crore for loan waiver 
मुख्य बातम्या

अमरावती जिल्ह्यात कर्जमाफीसाठी ७४२ कोटी रुपयांची गरज

टीम अॅग्रोवन

अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील सुमारे ९४ हजार ९२० शेतकऱ्यांना ७४२ कोटी सात लाख ८२ हजार रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यातील सुमारे ३४ हजार ३६३ शेतकऱ्यांचे खाते आधारलिंक नाही. अशा शेतकऱ्यांची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. ओला, कोरड्या दुष्काळाच्या फेऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात याची घोषणा केली. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेल्या एकापेक्षा अधिक कर्जखात्यात थकबाकी दोन लाखांपर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना या माफीचा लाभ मिळणार आहे. 

कर्जमाफीची रक्‍कम आधारलिंक असलेल्या कर्जखात्यात जमा केली जाईल. याच कालावधीत ज्या शेतकऱ्यांचे कर्जाचे पुनर्गठण, फेरमूल्यांकन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या एक किंवा जास्त कर्जखात्यात ३० सप्टेंबर रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्‍कम दोन लाखांपर्यंत असल्यास त्यांनादेखील कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. या अनुषंगाने सहकार सचिव, सहकार आयुक्‍त व मुख्यमंत्री यांनी व्हिसीव्दारे नुकताच संवाद साधला.

अशी आहे कर्जमाफी खातेदारसंख्या व (चौकटीत रक्‍कम लाखात)
अलाहाबाद बॅंक ३३५० (२६३५.१०)
बॅंक ऑफ महाराष्ट्र २७२३० (२७०५०.०१)
सेंट्रल बॅंक ९२३० (६०६७)
स्टेट बॅंक ऑफ इंडिया १३८२० (८४४३.१८)
युको बॅंक २६० (१४८.१४)
विदर्भ कोंकण बॅंक १०६० (८०३.८४)
जिल्हा बॅंक ३९९७० (२९०६१.०५)
एकूण ९४९२० (७४२०७.८२)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT