आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठा In the Ambeohal project 30% water storage
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठा In the Ambeohal project 30% water storage 
मुख्य बातम्या

आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठा

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ प्रकल्पात पहिल्यांदाच  ३० टक्के पाणी साचले आहे, ही समाधानाची बाब असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. शासकीय विश्रामगृहात मंत्री मुश्रीफ यांनी या प्रकल्पाबद्दल महसूल व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा कृतज्ञतापर सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.  मुश्रीफ म्हणाले, ‘‘कृष्णा खोरे लवादाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याचे एक थेंबही पाणी गेल्या दहा वर्षांत अडवले नव्हते. आंबेओहळ प्रकल्पाच्या रूपाने हे पाणी अडविण्यात यश मिळाले. आंबेओहळच्या शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे वचन मी दिले होते.’’  या वेळी उपजिल्हाधिकारी किशोर पवार, प्रांताधिकारी विजया पांगारकर, जलसंपदा विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता माने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे आदी अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पाची सहा हजार हेक्टर सिंचन क्षमता आहे. १,२५० एमसीएफटी पाणी या प्रकल्पात अडविले जाणार आहे. सातपैकी सहा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्ण झाले असून, एका बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित पुनर्वसन वाटपासाठी ३८ हेक्‍टर जमिनीची गरज आहे, त्यापैकी २२ हेक्टर जमीन शिल्लक आहे. अधिकाऱ्यांकडून जमिनीची गुणवत्ता तपासावयाचे आहे. ३५ शेतकऱ्यांची जमीन मागणी असून, ३१ शेतकऱ्यांनी पॅकेज मागणी केलेली आहे. परंतु; महसूल विभागाने वारंवार पत्र लिहूनही ते लोकच आलेले नाहीत. त्यामुळे करारनामे करण्यामध्ये अडचणी  येत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

Weather Update : सूर्य तळपल्याने होरपळ वाढली

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

SCROLL FOR NEXT