देशातील उच्चांकी तापमानाची अमरावतीत नोंद
देशातील उच्चांकी तापमानाची अमरावतीत नोंद  
मुख्य बातम्या

देशातील उच्चांकी तापमानाची अमरावतीत नोंद

टीम अॅग्रोवन

पुणे  : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. राज्यातील बहुतांशी शहरांतील उन्हाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्यावर गेला आहे. यामुळे अनेक ठिकाणी उन्हाची लाहीलाही झाली असून, उकाड्यात चांगलीच वाढ झाली. गुरुवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत अमरावती येथे देशातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  सध्या बंगालचा उपसागर ते कर्नाटकाचा दक्षिण परिसर, मन्नार आणि तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचे पट्टा सक्रिय होत आहे तसेच, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा परिसर आणि कर्नाटकाच्या उत्तर भागात समु द्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. उद्यापासून (शनिवारी) मध्य महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  राज्यात सायंकाळनंतर वातावरण थंड होत असले, तरी पहाटे हवेत काही प्रमाणात गारवा तयार होतो. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढत आहे. दुपारी उन्हाचा पारा चांगलाच वाढत असून, कमाल तापमान ४२ अंशांपर्यंत पोहचले आहे. खान्देशातही जळगाव, मालेगाव येथील तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्यावर गेले आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापुरातही तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. मराठवाडा, विदर्भातही उन्हाचा चटका वाढला आहे.      गुरुवारी (ता.२८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :   पुणे ३९.२ (१९.०), नगर (१८.६), जळगाव ४१.० (१९.२), कोल्हापूर ३७.६ (२२.७), महाबळेश्‍वर ३४.७ (१९.६), मालेगाव ४१.६ (१९.६), नाशिक ३८.५ (१८.४),  सांगली ३८.५ (१०.१), सातारा ३९.२ (१९.७), सोलापूर ४१.२ (२४.९), सांताक्रूझ ३३.३ (२२.६), अलिबाग ३२.४ (२१.७), रत्नागिरी ३२.२ (२४.७), डहाणू ३३.१ (२१.०), औरंगाबाद ३९.० (१९.४), बीड ४०.०, नांदेड ४०.० (२१.०), परभणी ४१.६ (२०.०), अकोला ४१.१ (२०.१), अमरावती ४२.२ (२२.२), बुलडाणा ३७.४ (२२.२),  ब्रह्मपुरी ४०.७ (२२.६), चंद्रपूर ४१.४ (२५.०), गडचिरोली ३८.८ (२२.०), गोंदिया ३५.४ (१८.६), नागपूर ३९.१ (१९.१), वर्धा ४०.० (२१.४), वाशिम ४०.० (२१.०), यवतमाळ ४०.५ (२३.४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT