To allegation in Satara against agricultural laws
To allegation in Satara against agricultural laws 
मुख्य बातम्या

कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणे

टीम अॅग्रोवन

सातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त किसान संघर्ष समन्वयच्या वतीने गुरुवारी (ता.३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

कामगार शेतकरी संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान सभा, बळिराजा शेतकरी संघटना, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

‘केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारे कायदे मंजूर केले आहेत. या कायद्याविरोधात पंजाब, हरियाना व इतर काही ठिकाणाहून लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा तयार करून देशातील सर्व शेतकरी व शेतमाल उत्पादक यांचे कंपनीकरण होऊन बाजार समिती यंत्रणा संपुष्टात येण्याचा धोका आहे, ’ असे संघटनेतर्फे सांगण्यात आले.

याचबरोबर सर्वसामान्यांच्या रेशनवरील अन्नधान्य व स्थानिक बाजार पेठांमधून उपलब्ध होणाऱ्या शेतमालास प्रतिरोध होणार आहे. यासंदर्भात सरकारबरोबर चर्चा करूनही हा कायदा केला आहे. या कायद्याविरोधात लाखो शेतकरी रस्त्यावर उतरुनही सरकारने आंदोलनाची दखल न घेता शेतकऱ्यांवर लाठीलार्ज केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT