Akola Zilla Parishad budget of 32.46 crores 
मुख्य बातम्या

अकोला जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प ३२.४६ कोटींचा

अकोला येत्या वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या ३२ कोटी ४६ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला गुरुवारी (ता. १०) जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीने मंजुरी दिली.

टीम अॅग्रोवन

अकोला ः येत्या वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या ३२ कोटी ४६ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला गुरुवारी (ता. १०) जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीने मंजुरी दिली. अर्थसंल्पात शेतकरी, महिलांसह इतर योजनांवर तरतूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त विविध विभागांच्या योजनांसाठी तरतूद करण्यात आली. दरम्यान, सभेत सुचवलेल्या दुरुस्त्यांसह आता सदर अहवाल अर्थसंकल्पीय सभेत ठेवण्यात येईल.  आगामी २०२२-२३ साठीचा जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीच्या सभेने मंजूर केला. त्यामुळे सदर अर्थसंकल्प आता सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. कृषी, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, पाणीपुरवठा विभागांसह अर्थसंकल्पात इतर विभागांसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यासोबतच दिव्यांगांसाठीच्या राखीव निधीसह शेतकरी, महिला व युवक-युवतींना रोजगार मिळण्यासह शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठीच्या योजनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. याबाबतची सभा जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा अर्थ समिती सभापती सावित्रीबाई राठोड होत्या.  सभेच्या सचिव तथा लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार, सदस्या पुष्पा इंगळे, वर्षा वझिरे, गायत्री कांबे, विनोद देशमुख, सुरेश फाटकर, पंचायत समिती अकोला सभापती राजेश वरोकार, तेल्हारा पंचायत समितीचे सभापती व इतरांची उपस्थिती होती. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dharati Mata Bachav Campaign: लातूरला धरती माता बचाव निगरणी समितीची स्थापना

Fund Utilisation Issue: ग्रामपंचायत विभागावर विभागीय आयुक्तांची नाराजी

Banana Crop Management: आंबोड्यात केळी पीक व्यवस्थापन शेतीशाळेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Revenue Village Status: जालना जिल्ह्यातील ४९ महसुली गावे घोषित करण्यावर चर्चा

Rabi Season: मोहोळमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी पिके जोमात

SCROLL FOR NEXT