अकोल्यात कांदा २५०० रुपये प्रतिक्विंटल
अकोल्यात कांदा २५०० रुपये प्रतिक्विंटल 
मुख्य बातम्या

अकोल्यात कांदा २५०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन

अकोला ः या हंगामात कांद्याला चांगला दर मिळण्याचा काळ सध्या सुरू आहे. चांगल्या प्रतीचा कांदा २५०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे; तर किरकोळ विक्री ही सर्रास ४० ते ५० रुपये प्रतिकिलो या दराने केली जात आहे. नवीन कांदा विक्रीला येईपर्यंत हे दर टिकून राहण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

बाजारात कांद्याचे दर वधारल्याने ग्राहकांमध्ये चर्चा होत आहे. शेतकऱ्यांना मिळत असलेल्या दरांपेक्षा व्यापारी अधिक कमावत असल्याची बाबही या निमित्ताने पुढे आली आहे. उच्चप्रतीचा कांदा येथील मार्केटमध्ये २२०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकत आहे. दुय्यम दर्जाचा कांदासुद्धा १५०० ते १८०० पर्यंत विकत आहे. सततच्या पावसामुळे कांद्यात सड अधिक निघत आहे. 

येथील बाजारात स्थानिक ठिकाणांवरून दररोज तीन ते चार ट्रक कांद्याची आवक होत आहे. हा सर्व जुना कांदा आहे. नवीन कांद्याची येत्या १० ते १२ दिवसांत आवक सुरू होण्याची शक्यता आहे. हा कांदा मोठ्या प्रमाणात जोपर्यंत विक्रीसाठी येत नाही, तोवर आताच्या दरांमध्ये घसरणीची कुठलीही शक्यता नसल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. सणासुदीचा काळ सुरू होताच कांद्याची मागणी वाढते. ही वाढलेली मागणी व कमी आवक यामुळे कांदयाचे दर बऱ्याच महिन्यानंतर वधारलेले आहेत. कांद्याचा सध्याचा ठोकचा दर आणि किरकोळ विक्री यात मोठी तफावत आहे. बाजारात कांदा सर्रास ४० ते ५० रुपये प्रतिकिलोने ग्राहकांना खरेदी करावा लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT