‘एक राज्य एक ब्रँड’ धोरण स्वीकारा ‘One State One Brand’ Accept the policy
‘एक राज्य एक ब्रँड’ धोरण स्वीकारा ‘One State One Brand’ Accept the policy 
मुख्य बातम्या

‘एक राज्य एक ब्रँड’ धोरण स्वीकारा; लाखगंगा ग्रामसभेत ठराव

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : अनिष्ट ब्रँड वार रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरण स्वीकारा. दूध उत्पादकांची या पुढील काळात लूटमार करता येणार नाही, यासाठी खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल, असा कायदा करा, आदी महत्त्वपूर्ण ठराव लाखगंगा येथे शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आले.  दूध दरवाढीच्या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती किसान सभा व इतर समविचारी शेतकरी संघटनांनी रणसिंग फुंकले आहे. याला प्रतिसाद म्हणून वैजापूर तालुक्यातील लाखगंगा ग्रामपंचायत ने शुक्रवारी (ता. १८) ग्रामसभेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात ठराव घेतला आहे. लाखगंगा पुन्हा एकदा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरते आहे. परवड मांडलेल्या दूध उत्पादकांच्या प्रश्नावर लाखगंगा येथे शुक्रवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला किसान सभेचे डॉ. अजित नवले, शेतकरी नेते धनंजय पाटील-धोरडे, जि. प. सदस्य पंकज ठोंबरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर जगताप, राजेंद्र कराळे, पुणतांबा ग्रामपंचायतीचे सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे, लाखगंगा सरपंच उज्वला सचिन पडवळ आदी उपस्थित होते.

ग्रामसभेतील ठरावाच्या इतर मागण्या

  •   ज्या खासगी व सहकारी दूध संघांनी लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत दूध खरेदीचे दर पाडले, त्या सर्व दूध संघाचे ऑडिट करा.
  •   दुधाची मागणी किती घटली, त्या प्रमाणात किती दर कमी देण्यात आले याची सखोल चौकशी करा. परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्याची लूटमार करणाऱ्या खासगी व सहकारी दूध संघावर 
  • कठोर कारवाई करा.
  •   झालेली लुटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा व लॉकडाउन पूर्वी मिळत असलेला प्रति लिटर ३५ रुपये दर तातडीने सुरू करा. साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी एफआरपी व शिल्लक मिळकतीत हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरिंग असे कायदेशीर दुहेरी संरक्षण लागू करा.
  •   दूध भेसळ बंद करा, टोंड दुधावर बंदी आणा, भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करा. ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात होईल उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्या.
  • प्रतिक्रिया
  • लॉकडाउनमध्ये रुग्णालयाचे सरकारने ऑडिट केले. तोच नियम लावून दूध उत्पादकांची जी लूट झाली, त्या दूधसंघांचे पण सरकारने ऑडिट करावे. पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आंदोलनासाठी मजबूर करू नये. - डॉ. अजित नवले, शेतकरी नेते, किसान सभा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Market : कांद्याच्या प्रश्नावर ‘जय श्रीराम’चे उत्तर

    Sugarcane Harvester : ऊस तोडणी यंत्र योजनेत पूर्वसंमती रद्द होण्याची भीती

    Monsoon Update : मॉन्सून अंदमानात दाखल

    Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम

    Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

    SCROLL FOR NEXT