अकलूज नगरपालिकेच्या  मागणीसाठी माळशिरसला उपोषण Of Akluj Municipality Malshirasala fast for demand
अकलूज नगरपालिकेच्या  मागणीसाठी माळशिरसला उपोषण Of Akluj Municipality Malshirasala fast for demand 
मुख्य बातम्या

अकलूज नगरपालिकेच्या मागणीसाठी माळशिरसला उपोषण

टीम अॅग्रोवन

सोलापूर : अकलूज येथे नगरपालिका व नातेपुते येथे नगरपंचायत करण्याच्या मागणीसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. १८) अकलूज, नातेपुते व माळेवाडी येथील नागरिकांनी माळशिरस तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.  जिल्ह्यातील या दोन्ही ग्रामपंचायतीचे नगरपालिका आणि नगरपंचायतीत रुपांतर करण्यासाठी राज्य सरकार जाणीवपूर्वक खोडा घालत असल्याचा आरोप या वेळी आमदार मोहिते पाटील यांनी केला. तसेच राज्य सरकारने ठोस भूमिका जाहीर न केल्यास अकलूज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. आमदार राम सातपुते यांनी महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. सर्वसामान्य जनतेला विकासापासून वंचित ठेवण्याचे राजकारण या सरकारने न थांबवल्यास विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह आवाज उठवणार असल्याचे त्यांनी बजावले. भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्य शीतलदेवी मोहिते पाटील, अकलूजचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी याप्रश्नी कशी अडवणूक केली जात आहे, याबाबतची माहिती दिली. तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, बाजार समितीचे उपाध्यक्ष मामा पांढरे, अॅड. भानुदास राऊत, सभापती शोभा साठे, उपसभापती प्रताप पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, अकलूजच्या सरपंच पायल मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT