हल्लाबोल यात्रेनिमित्त जाफ्राबाद येथे बुधवारी (ता. २४) काढलेल्या रॅलीदरम्यान जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांशी व नागरिकांशी हस्तांदोलन करताना माजी मुख्यमंत्री अजित पवार.
हल्लाबोल यात्रेनिमित्त जाफ्राबाद येथे बुधवारी (ता. २४) काढलेल्या रॅलीदरम्यान जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांशी व नागरिकांशी हस्तांदोलन करताना माजी मुख्यमंत्री अजित पवार. 
मुख्य बातम्या

सारेच त्रस्त, मग सरकार नेमके कोणाच्या हिताचे : अजित पवार

टीम अॅग्रोवन

जाफराबाद, जि. जालना : भाजपप्रणीत सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले. या सरकारच्या काळात सर्वच त्रस्त असल्यामुळे हे सरकार नेमके कोणाच्या हिताचे आहे, हेच कळेना. केवळ घोषणाबाज असलेल्या या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्‍न सुटणार नाहीत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित हल्लाबोल यात्रा बुधवारी (ता.२४.) जाफराबाद येथे पोचली. जाफराबादच्या तहसील कार्यालयाच्या मैदानात मोर्चानंतर झालेल्या सभेत माजी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. या वेळी माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, खासदार माजीद मेमन, जिल्हाध्यक्ष डाॅ. निसार देशमुख, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरेखा लहाने, माजी खासदार पुंडलिक हरी दानवे, आमदार चंद्रकांत दानवे, राजेश चव्हाण, कदीर मौलाना, रामधन कळंबे यांची उपस्थिती होती.  श्री. पवार म्हणाले, की केंद्र आणि राज्यात भाजप- शिवसेना आघाडीचे सरकार आहे. सर्वसामान्याच्या मुळावरच आलेले हे सरकार आहे. या सरकारने सर्वसामान्यांना रांगेत उभे करून वेठीस धरले. अशा सरकारला जनतेने आता त्याची जागा दाखवावी. माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले, की शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी हल्लाबोल यात्रा आहे. या वेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनीही आपले विचार व्यक्‍त केले.  प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण यांनी केले. खासदार माजीद मेनन यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शेख कौसर यांनी केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT