गोळीबारात जखमी शेतकऱ्यांची अजितदादांनी केली विचारपूस
गोळीबारात जखमी शेतकऱ्यांची अजितदादांनी केली विचारपूस 
मुख्य बातम्या

गोळीबारात जखमी शेतकऱ्यांची अजितदादांनी केली विचारपूस

सकाळ वृत्तसेवा

नगर : शेवगावमध्ये ऊस दरवाढीवरून पेटलेल्या आंदोलनात पोलिसांकडन गोळीबार, लाठीहल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरच्या खासगी रुग्णालयात येऊन विचारपूस केली. शेतकऱ्यांना नाव, गाव, वय विचारत आपलेसे केले. शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत. तुम्ही धीर धरा. मी तुमच्या पाठिशी आहे, असे म्हणून पवार यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

या वेळी आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. शेवगावमध्ये काल ऊसदरवाढीसाठी पेटलेले आंदोलन अधिक चिघळले होते. पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीहल्ला झाला. गोळीबार झाल्याने शेतकऱ्यांची पळापळी झाली. आंदोलकांनी जाळपोळ केली. रस्त्यावर टायर जाळून, बसही पेटविली.

या पार्श्वभूमीवर या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले. आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या दोन रुग्णांवर नगरच्या मॅक्‍सिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुर आहेत. आज सकाळी पवार यांनी रुग्णांची भेट घेतली. रुग्णांची विचारपूस करून त्यांचे रिपोर्टस पाहिले. एक्‍स-रे पाहून कोठे हाड मोडले का, याची विचारपूस डॉक्‍टरांकडे केली. आमदार संग्राम जगताप यांनी आंदोलनाची स्थिती व तणावपूर्ण स्थितीची माहिती पवार यांना दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT