संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचे निधन

टीम अॅग्रोवन

मुंबई : ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे आज (रविवार) मुंबईतील कांजूरमार्ग येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. दाते यांच्या निधनाने मराठी भावसंगीताचा शुक्रतारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव सायन येथील स्मशानभूमीत दुपारी १२ ते ४ दरम्यान अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

शुक्रतारा मंदवारा, शतदा प्रेम करावे, भातुकलीच्या खेळामधली... अशा अजरामर भावगीतांनी मराठी श्रोत्यांच्या मनात अरुण दाते यांनी स्थान मिळविले होते. त्यांचा जन्म ४ मे १९३४ मध्ये इंदूर येथे झाला. वडील रामूभैया दाते हे इंदूरमधील एक प्रसिद्ध गायक होते. त्यांच्या इच्छेनुसार धार येथे जाऊन अरुण दाते यांनी कुमार गंधर्व यांच्याकडे गाणे शिकायला सुरवात केली.

पुढे गाण्यात कारकीर्द करायला सुरवात केल्यानंतर १९५५ पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. वयाच्या पन्नाशीत त्यांनी भावगीतांवर आपले लक्ष केंद्रित केले. १९६२ मध्ये शुक्रतारा मंदवारा या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली आणि हे गीत तुफान लोकप्रिय झाले. अशा एकाहून एक गीतांनी त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.

ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या निधनाने मराठी भावगीतांच्या क्षेत्रातील एक शुक्रतारा जणू निखळला आहे. भातुकलीच्या खेळामधला राजा आणि राणी, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शुक्र तारा मंद वारा, अशी अनेक गीते संस्मरणीय ठरली आहेत. मराठी रसिकांमध्ये भावगीते लोकप्रिय करण्यात दाते यांचे मोलाचे योगदान आहे. दाते यांच्या निधनाने मराठी भावविश्वाला शब्दस्वर देणारा एक श्रेष्ठ भावगीत गायक आपण गमावला.  - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT