संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

तलाठ्यांचा डिजिटल सिग्नेचरच्या कामावरील बहिष्कार मागे

टीम अॅग्रोवन

मुंबई : तलाठ्यांच्या सर्वसाधारण बदल्या, रिक्त पदांची भरती, ऑनलाइन सातबारा कामासंदर्भात दिलेल्या नोटिसा मागे घेणे आदी तलाठी संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. या चर्चेनंतर तलाठी संघटनेने सातबारामधील डिजिटल सिग्नेचरच्या कामकाजावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला असल्याचे जाहीर केले.

राज्य तलाठी संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात संघटनेच्या प्रतिनिधींची महसूलमंत्री श्री. पाटील यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली. या वेळी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ऑनलाइन सातबारा प्रकल्पाचे समन्वयक रामदास जगताप, तलाठी संघटनेचे अध्यक्ष एस. एम. जोशी, महासंघाचे सरचिटणीस बाळकृष्ण गाढवे, विदर्भ पटवारी संघटनेचे संजय अनव्हाने, एम. बी. सावंत, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र जाधव आदी या वेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील सर्व सातबारा उतारे ऑनलाइन करण्यासाठी राज्य शासनाने प्रकल्प हाती घेतला आहे. हे काम करण्यासाठी राज्य शासनामार्फत तलाठ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले होते. काही ठिकाणी लॅपटॉप अद्याप दिले नाहीत, अशा ठिकाणी लवकरच अद्ययावत लॅपटॉप देण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच तलाठ्यांच्या सर्वसाधारण बदल्या थांबविण्यात आल्या होत्या.

आता ३१ मेपर्यंत या बदल्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तलाठ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, डिजिटल सातबारा प्रकल्प राबविताना तलाठ्यांवर केलेली कार्यवाही मागे घेण्यासंबंधी सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

राज्यातील ऑनलाइन सातबारा प्रकल्प राबविताना तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आदींनी अहोरात्र मेहनत केली. त्यामुळे राज्यातील सर्वच गावांतील सातबारा उतारे डिजिटल झाले आहेत. या कामाची दखल घेऊन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी तलाठ्यांचे अभिनंदन केले. होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT