बुलडाणा ः जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर सोमवारी (ता. २६) आंदोलन करताना स्वाभिमानीचे नेते व शेतकरी.
बुलडाणा ः जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर सोमवारी (ता. २६) आंदोलन करताना स्वाभिमानीचे नेते व शेतकरी. 
मुख्य बातम्या

'स्वाभिमानी'ने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर टाकले टोमॅटो

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : शेतमालाला भाव नसल्यामुळे आधीच शेतकरी त्रस्त असून, आता राज्यात भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी (ता.२६) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर शेतकऱ्यांनी टोमॅटो टाकून आपला संताप व्यक्त केला. 

पोलिसांनी तुपकर यांसह जवळपास १०० शेतकऱ्यांना अटक करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. या वेळी संतापलेल्या शेतकऱ्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. शेतकरी मोठ्या मेहनतीने शेती पिकवितो. मात्र, बाजारात पिकाला भाव नसल्याने त्यांच्या मेहनतीवर सध्या पाणी फिरविले जात आहे. मेहकर तालुक्यातील बोरी येथील संजाब आश्रू बचाटे या शेतकऱ्याने शेतातील वांगी व टोमॅटोला बाजारात विक्रीसाठी नेले. मात्र, बाजारात या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतापलेल्या या युवा शेतकऱ्याने शेतातील वांगी व टोमॅटोची झाडे अक्षरश: कुऱ्हाडीने तोडून टाकली. 

या पार्श्वभूमीवर सोमवारी शेतकऱ्यांनी ''स्वाभिमानी''चे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात दोन ट्रॉली टोमॅटो आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाकून सरकारचा निषेध केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT