संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

शेतीकामासाठी सालगड्यांची कमतरता

टीम अॅग्रोवन

अमरावती  ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन सालगडी ठेवण्याची परंपरा आहे. परंतु या वर्षी मात्र सालगड्याच्या वार्षिक मेहनतान्यात झालेली वाढ आणि त्यांच्या उपलब्धतेचा अभाव या कारणांमुळे अनेक ठिकाणी सालगडी ठेवण्याच्या परंपरेला ब्रेक लागल्याची चित्र आहे. 

ग्रामीण भागात खरीप व रबी हंगामात हंगामी मजुरांची गरज भासते. त्यासोबतच २४ तास कुटुंबासह शेतावर राहत शेतीमालकाच्या अनुपस्थितीत त्यांची कामे सांभाळणाऱ्या सालगड्यांची नेमणूक केली जाते. बहुतांश ठिकाणी सालगडी हे शेतावर राहूनच जबाबदाऱ्या सांभाळतात. त्याच गावातील सालगडी असल्यास ते घरूनदेखील कामांची जबाबदारी पार पाडतात. गुढीपाडव्यापासून सालगड्यांचे नवे वर्ष सुरू होते. 

सालगडी ठरवून पाडव्याला त्याचे नवीन कपडे देऊन स्वागत होते. या वर्षी मात्र शहरातील कामावर मिळणाऱ्या मजुरीच्या तुलनेत शेतीकामात मजुरी कमी मिळते; म्हणून अनेकजण सालगडी म्हणून राबण्यास तयार होत नाहीत. त्यामुळेदेखील यंदा सालगड्यांची कमतरता असल्याचे चित्र आहे.

त्यासोबतच शेतीकामात आता बैलजोडीपेक्षा यांत्रिक पर्यायाचा विचार शेतकरी करू लागले आहेत.  परिणामी कमी मजुरांमध्ये अधिक काम होणे सुलभ झाले. परंतु काही शेतकरी मात्र सालगड्यांचा विचार करत परंपरा जोपासतात. त्यानुसार या वर्षी सालगड्यांचे पगार ७५ हजार रुपयांपासून १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत पोचले आहेत. शेतीतील वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत सालगड्यांचे वेतन वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT