संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

शिवसेनेनं असं वागायला नको होतं : फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे : पालघर लोकसभा निवडणुकीत माजी खासदार (कै.) चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेत प्रवेश देणे हे दुर्देेेेेेेवी आहे. शिवसेनेनं असं वागायला नको होतं, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

या निवडणुकीत भाजपचा उमेदवार शिवसेनेनं पळविल्याबद्दल फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. वनगा यांच्या मुलालाच भाजप उमेदवारी देणार होते. हे शिवसेनेला माहीत असूनही त्याला मातोश्रीवर नेण्यात आले. त्यांच्याशी संपर्क होणार नाही, अशा पद्धतीने ठेवण्यात आले. मला त्याविषयी काही बोलायचे नाही. पण, शिवसेनेची ती पद्धत आहे.

ही जागा भाजपची आहे. भाजपने ती जिंकली आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपचे सर्व कार्यकर्ते जिंकण्याच्या हेतूने लढणार आहेत. माजी मंत्री आणि काॅंग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गावित हे भाजपकडून निवडणूक लढविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नाशिकच्या शिवसेना उमेदवाराचे भवितव्य फडणवीसांच्या मर्जीवर? नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत दोघांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. शिवाजी सहाने यांसह भाजपच्या सदस्यांनी सुचक म्हणून सह्या केलेले परवेझ कोकणी हे तीन उमेदवार राहिले. 

भाजपशी सख्य असलेले कोकणी शिवसेनेला अडचणीचे, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर याची चर्चा आहे. मात्र भाजपने अधिकृत उमेदवार दिलेला नसल्याने त्यांच्या १६७ मतदारांवर निकाल ठरेल. त्यासाठी पुन्हा वरिष्ठ नेते चर्चा करून नाशिकची जागा व पक्षाची प्रतिष्ठा दोन्ही राखणार का, याला महत्त्व आले आहे.

कोकणी यांचा अर्ज अद्याप राहिला आहे. त्यांचे सुचक पुरुषोत्तम लोहगावकर यांनी भाजपच्या वरिष्ठांशी संपर्क साधला जाईल, असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी सहाणे यांनी शिवसेनेचे मतदार पोखरण्यास सुरवात केली आहे. अशा स्थितीत भाजपकडे निर्णायक मतदार असून, शिवसेना उमेदवाराचे भवितव्य मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Varieties Conservation : स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक बियाणे बॅंक

Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’

Condensing Economizer : बायोगॅस ज्वलनातून मिळेल शुद्ध पाणी

Sugarcane Bills : शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही, पांटबंधारे विभागाची वसुलीसाठी कसरत

Onion Export Ban : संवेदनशील कांदा, असंवेदनशील राज्यकर्ते

SCROLL FOR NEXT