संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात तूर खरेदी संथ गतीनेच

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः जिल्ह्यात १५ तालुके आहेत. पण तूर खरेदी संथ गतीने सुरू असून, आजघडीला १६ हजार ३५४ क्विंटल खरेदी झाली आहे. परंतु जिल्ह्यात तूर लागवड अतिशय कमी होती. त्यातच खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी आपली तूर विकली. त्यामुळे सध्या शेतकी संघांमध्ये सुरू असलेल्या तूर खरेदी केंद्रांमध्ये फारशी आवक नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.  

जिल्ह्यात २ फेब्रुवारीला तूर खरेदी सर्वप्रथम अमळनेर येथे सुरू झाली. या केंद्रात सर्वाधिक चार हजार ७०० क्विंटल तूर खरेदी झाली असून, इतर केंद्रांमध्ये जामनेर, रावेर व मुक्ताईनगरात खरेदी झाली आहे. परंतु आवक हवी तशी नाही. जिल्ह्यात १५ तालुके आहेत. परंतु तूर खरेदी हवी तशी नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

त्यावर प्रशासनाने मात्र नऊ केंद्र सुरूच आहेत. एकही केंद्र बंद केलेले नाही. जिल्ह्यात सुमारे १९०० हेक्‍टरवर तुरीची लागवड झाली होती. त्यात रावेरात बागायती तूर अधिक होती. रावेरात अनेक कंपन्यांनी तुरीचे प्लॉट दिले, तेथे ठरल्यानुसार हमीभावाने खरेदी केली. त्यामुळे आवक अधिक नाही. सुरवीतालाच नोंदणीबाबतही प्रतिसाद नव्हता. म्हणून तूर खरेदी सुरू व्हायला विलंब झाला. नंतर गावोगावी जाऊन ऑफलाइन नोंदणी करण्याची तयारी प्रशासनाने केली होती. त्यातच शासनाकडून सूचना येताच केंद्र सुरू केले.

मागील वर्षातील गरज लक्षात घेता नऊ खरेदी केंद्र सुरू केले. त्यात सुरवातीला एक. नंतर चार आणि आणखी काही दिवसांनी चार केंद्र सुरू केले. सध्या जिल्ह्यात रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, जळगाव, अमळनेर, चोपडा, पाचोरा व चाळीसगाव येथे तूर खरेदी केंद्र सुरू आहेत.

हरभरा खरेदीसाठी ११ केंद्र जिल्ह्यात हरभरा खरेदीचीही तयारी सुरू आहे. त्यात सध्या जेथे तूर खरेदी सुरू आहे, त्या नऊ ठिकाणी आणि शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून यावल व भडगाव येथेही तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मार्केटींग फेडरेशनने जिल्हा प्रशासनास सादर केला आहे. जिल्ह्यात हरभऱ्याची पेरणी अधिक होती. बाजारात दरही अपेक्षित नाहीत, त्यामुळे हरभरा खरेदी केंद्र अधिक व योग्य ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मार्केटींग फेडरेशनचे पणन अधिकारी परिमल साळुंखे म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT