दूध दराच्या प्रश्नांवर शुक्रवारी लाखगंगा येथे बैठक
दूध दराच्या प्रश्नांवर शुक्रवारी लाखगंगा येथे बैठक 
मुख्य बातम्या

दूध दराच्या प्रश्नांवर शुक्रवारी लाखगंगा येथे बैठक

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद  : दूध दराच्या प्रश्नावर ग्रामसभेतून फुकट दूधवाटप करण्याचा निर्णय घेऊन सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या लाखगंगा येथे शुक्रवारी (ता. १८) दूध उत्पादकांची महत्त्वपूर्ण बैठक होऊ घातली आहे. या बैठकीत पुढे नेमके काय करायचे, मागणीच्या अनुषंगाने आंदोलनाची पुढील दिशा कशी असावी, याविषयी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांनी दिली. 

या महत्त्वपूर्ण बैठकीला आमदार बच्चू कडू यांच्यासह डॉ. अजित नवले यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. शिवाय लाखगंगासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील दूध उत्पादक व घसरलेल्या दूध दराच्या प्रश्नांवर लढा देणारे शेतकरी नेते, भूमिपूत्र शेतकरी संघटनेचे नेतेही बैठकीत सहभागी होणार असल्याचे श्री. धोर्डे यांनी सांगितले. लाखगंगा येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरात शुक्रवारी सकाळी ११ वाजता ही बैठक सुरू होणार आहे. 

फुकट दूध वाटण्याचा निर्णय घेऊन लाखगंगा येथील ग्रामसभेने मोडकळीस आलेल्या दुग्ध व्यवसायाच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शासनाने दूध भुकटीचे उत्पादन करणाऱ्यांना अनुदान जाहीर केले. परंतु जवळपास आठवड्याचा अवधी लोटूनही दूध उत्पादकांना शासनाने जाहीर केलेला प्रतिलिटर २७ रुपयांचा दर मिळण्याचा प्रश्न कायम आहे. 

प्रशासन व शासन स्तरावर दुध दराविषयी सुरू असलेल्या खलबतांमुळे दराचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा दूध उत्पादकांना आहे. दुसरीकडे उत्पादन व खर्चाची सांगड बसत नसल्याने आपल्याकडील दुभती जनावरं विकण्याचे कामही दूध उत्पादक करीत आहेत. त्यामुळे आता शुक्रवारी लाखगंगा येथे होणाऱ्या बैठकीतून कोणता निर्णय घेतला जातो याकडे दूध उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT