हरभरा बियाणे
हरभरा बियाणे  
मुख्य बातम्या

अनुदानित हरभरा बियाणे ४५० रुपयांनी स्वस्त

Gopal Hage

अकोला ः आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणारे हरभऱ्याचे बियाणे यावर्षी महाबीजकडून सुमारे साडेचारशे रुपये कमी दराने दिले जाणार आहे. गेल्या वेळी २२५० रुपयांना विकलेली अनुदानित बॅग यावर्षी १९५० रुपयांनाच शेतकऱ्यांना मिळणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत हे अनुदानित बियाणे उपलब्ध करून दिले जात आहेत. रब्बी हंगामाच्या दृष्टीने राज्यात विदर्भ वगळता सर्वत्र चांगला पाऊस झालेला आहे. येत्या काळात विदर्भातही परतीचा मॉन्सून झाला तर संपूर्ण राज्यातच रब्बीसाठी पोषक परिस्थिती बनू शकते. रब्बीमध्ये राज्यात हरभरा हे प्रथम क्रमांकाचे तर क्षेत्राच्या बाबतीत गहू हे दुसऱ्या क्रमांकावरील पीक आहे. हे लक्षात घेता राज्यात सर्वांत मोठे बियाणे पुरवठादार असलेल्या महाबीजने वाढीव बियाण्याचेही नियोजन केले आहे.  यावेळी हरभरा व रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात वाढीची शक्‍यता आहे. राज्यात हरभऱ्याचे १३ लाख ६५ हजार हेक्‍टर सरासरी क्षेत्र आहे. यासाठी आठ लाख १९ हजार क्विंटल बियाणे लागू शकते. मात्र शेतकरी घरगुती बियाणे अधिक वापरतो. केवळ ३५ टक्के बियाणे बदल केला जातो. त्यामुळे महाबीजने दोन लाख १५ हजार २४७ क्विंटल हरभरा बियाणे उपलब्ध करून देण्याचे निश्‍चित केले आहे. गेल्या वर्षीपेक्षा सुमारे १४ हजार क्विंटल हे बियाणे अधिक आहे. राज्यात विविध भागात पाण्याच्या उपलब्धतेमुळे गव्हाची लागवडही वाढू शकते, हे लक्षात घेता महाबीजने एक लाख नऊ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करण्याचे नियोजन केले. गेल्या वर्षीपेक्षा जवळपास ३९ हजार क्विंटल बियाणे अधिक असेल. पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात रब्बी ज्वारी लागवडीत वाढ होणार असल्याने त्यासाठी सुमारे २२ हजार १९५ क्विंटल बियाणे महाबीज देणार आहे. यावर्षी हरभरा बियाणे ९ हजार रुपये क्विंटल दराने मिळू शकेल. गेल्या वर्षी हाच दर दहा हजार ५०० रुपये ठेवण्यात आला होता. अनुदानावर शेतकऱ्यांना ६५ रुपये किलोने बियाणे मिळणार आहे. ३० किलो वजनाची बॅग १९५० रुपयांना मिळू शकेल. अनुदानित बियाणे वाढीची मागणी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या १५ वर्षाआतील बियाण्याच्या वाणाला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत अनुदान दिले जाते. गेल्या वेळी १ लाख ५१ हजार क्विंटल बियाण्याला अनुदान दिले होते. यावर्षी वाढीव बियाणे पाहता एक लाख ७५ हजार क्विंटल बियाणे अनुदानित केले जावे, अशी मागणी महाबीजने शासनाकडे केली आहे. याला मंजुरी मिळाली तर त्याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होऊ शकेल.   राज्यातील रब्बी सरासरी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • हरभरा ः १३,६५,०००
  • गहू ः ९,६७,०००
  • ज्वारी ः ३,१६,०००
  • करडई ः १,२४,०००
  •  महाबीजचे बियाणे नियोजन (क्विंटलमध्ये)

  •  हरभरा ः २,१५,२४७ 
  •  गहू ः १,०९,०००
  •  ज्वारी ः २२,१९५
  •  करडई ः ५३०
  •  बियाण्याचा प्रतिक्विंटल भाव (रुपये)

  • हरभरा ः ९०००
  •  गहू ः ३२००
  •  ज्वारी ः ५७००
  •  करडई ः ७२००
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

    Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

    Veterinary : पशुचिकित्सा पुनर्रचनेविरोधात पदविकाधारकांनी थोपटले दंड

    Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

    Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

    SCROLL FOR NEXT