दानोळी, जि. कोल्हापूर ः इचलकरंजी शहराला पाणी देण्याच्या विरोधात बुधवारी (ता.२) संपूर्ण गावाने एकत्र येऊन आंदोलन केले.
दानोळी, जि. कोल्हापूर ः इचलकरंजी शहराला पाणी देण्याच्या विरोधात बुधवारी (ता.२) संपूर्ण गावाने एकत्र येऊन आंदोलन केले. 
मुख्य बातम्या

इचलकरंजी पाणी योजनेच्या विरोधात दानोळीचे ग्रामस्थ एकवटले

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर  : इचलकरंजी शहराला वारणा नदीतून पाणी द्यायचे नाही, ही लोकभावना प्रबळ होऊन दानोळी (ता. शिरोळ) येथे अख्खे गाव एक झाले. या योजनेच्या विरोधात बुधवारी (ता. २) जोरदार घोषणाबाजी केली. ग्रामस्थांनी गाव बंद करून गावाकडे येणारे सर्व रस्ते रोखून या योजनेला विरोध दर्शविला. तर वाढता विरोध पाहता योजनेच्या कामासाठी आलेले अधिकारी परतले.   

या कामाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच ऑनलाइन केले आहे. योजनेच्या बांधकामाचा प्रारंभ करण्यासाठी अधिकारी गावात येणार असल्याचे समजताच गावात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. दुपारी उशिरापर्यंत उद्‌घाटन करण्यासाठी आलेले अधिकारी गावात ठाण मांडून बसले होते. तर, ग्रामस्थ उद्‌घाटन करू देण्याच्या मनस्थितीत नसल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

इचलकरंजी शहराला पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी दानोळी गावातून इचलकरंजी शहराला वारणा नदीतून पाणीपुरवठा करणारी अमृत योजना शासनाने गेल्या वर्षी मंजूर केली. परंतु, इचलकरंजी शहरवासीयांनी पंचगंगा नदी प्रदूषित केली.

तसेच, सध्या शहराला कृष्णा नदीतून पाणीपुरवठा सुरू आहे. ती योजनाही त्यांना नीट चालविता येत नाही, असे असतानाही इचलकरंजीसाठी वारणा नदीतून पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले. या निर्णयाला दानोळीसह वारणाकाठावरील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शंभरहून अधिक गावांनी विरोध दर्शविला होता. दानोळीतून योजना होणार असल्याने दानोळीवासीयांचा विरोध प्रचंड होता. 

या कामाचा प्रारंभ बुधवारी होणार असल्याने सकाळपासून मुख्य चौकात ग्रामस्थ एकत्र येण्यास सुरवात झाली. वारणा बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी भाषण करून सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. याच वेळी ग्रामस्थांनी गाव बंद केले. गावात येणाऱ्या मार्गावर दगड व टायरी पेटवून गावात येणारे रस्ते बंद केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

SCROLL FOR NEXT