डाळिंब बाग
डाळिंब बाग 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांच्या फळ पीकविमा रकमेबाबत गोंधळ कायम

Abhijeet Dake

सांगली : ‘पंतप्रधान पीकविमा योजने’अंतर्गत ‘हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना २०१६’मध्ये जिल्ह्यातील ९३६६ शेतकऱ्यांनी ५० कोटी ६२ लाखांचा विमा उतरवला आहे. मात्र २०१६ मधील नुकसानभरपाईतील शेतकऱ्यांच्या यादीवरून विमा कंपनीचा घोळ सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या १ कोटी ४७ लाख रुपयांची यादी पाठवली; मात्र शेतकऱ्यांना किती रक्कम द्यायची, याबाबत उल्लेख नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. परिणामी, ही रक्कम बॅंकेत तशीच पडून आहे.

जिल्ह्यात हवामानावर आधारित पंतप्रधान फळ पीकविमा योजना द्राक्ष, डाळिंब आणि आंबा या पिकांसाठी लागू आहे. या योजनेअंतर्गत ९३६६ शेतकऱ्यांनी ५० कोटी ६२ लाखांचा विमा उतरविला होता. त्यासाठी २ कोटी २४ लाख रुपये हप्ता भरला आहे. विम्याच्या नुकसानभरपाईपोटी १ कोटी ३२ लाख रुपये जिल्हा बॅंकेला काही महिन्यांपूर्वीच मिळाले आहेत. मात्र, यामध्ये लाभार्थींची संख्या व नावे बॅंकेला कंपनीने दिली नाही. यामुळे हा विमा शेतकऱ्यांना कसा देणार, असा प्रश्‍न जिल्हा बॅंकेला पडला आहे.

त्याचप्रमाणे ही माहिती मिळवण्यासाठी कंपनीला वारंवार संपर्क करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते आहे; तसेच जिल्हा बॅंकेने याबाबत जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनाही माहिती दिली आहे. मात्र कंपनीने लाभार्थी व त्यांची रक्कम यांची माहिती न दिल्याने ही रक्कम मागील तीन महिन्यांपासून बॅंकेत पडून राहिली होती.

विमा कंपनीकडून प्रलंबित असलेली शेतकऱ्यांची यादी पाठविली आहे; परंतु रक्कम १ कोटी ३२ लाख रुपये प्राप्त असताना १ कोटी ४७ लाख रुपयांची यादी पाठविण्यात आली आहे. शेतकऱ्यांची नावे प्राप्त झाली आहेत; परंतु प्रत्येक शेतकऱ्यास किती रक्कम अदा करायची, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीकडे पीकविम्याच्या नुकसानभरपाईबाबत विचारणा केली असता कार्यवाही चालू असल्याचे सांगण्यात येते. गतवर्षीच्या विम्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात रक्कम कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पीकविमा भरल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी व त्याची रक्कम याची माहिती कंपनीने जिल्हा बॅंकेला देणे बंधनकारक आहे. त्याशिवाय नुकसानभरपाई देणे शक्‍य नाही. जिल्हा बॅंकेने वारंवार माहिती मागविली आहे; पण कंपनी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. यामुळे बॅंकेत पैसे असूनदेखील ते देता येत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

SCROLL FOR NEXT