agrowon_e_gram_app_1.jpg
agrowon_e_gram_app_1.jpg 
मुख्य बातम्या

कोरोनाशी लढण्यासाठी ॲग्रोवन ई- ग्राम ॲप सज्ज

टीम अॅग्रोवन

पुणे : ग्रामीण भागात कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ॲग्रोवन ई-ग्राम ॲपने अनेक अभिनव सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आपल्या गावातील सर्व लोकांच्या आरोग्याचा ट्रॅक ठेवणे, आरोग्यविषयक सर्वेक्षण, आरोग्य फॉर्म, कोरोनाविषयी खात्रीशीर व अद्ययावत माहितीची उपलब्धता आदी बाबींचा त्यात समावेश आहे.  ॲग्रोवन ई- ग्राम हे ग्रामपंचायती डिजिटल करण्यासंबंधीचे ॲप असून ग्रामीण महाराष्ट्रात ते वेगाने लोकप्रिय होत आहे. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या ॲपमध्ये अनेक फिचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी या सुविधांचा वापर करता येईल.  या ॲपमध्ये कोरोना टॅब उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामध्ये कोरोनाबद्दल खात्रीशीर माहिती व बातम्या मिळणार आहेत. तसेच या ॲपच्या माध्यमातून गावाचा डिजिटल आरोग्य सर्वे करता येणार आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची माहिती डिजिटली गोळा करता येईल. त्यातून आपल्याला गावातील लोकांचे आरोग्य कसे आहे, गावात कोण आजारी आहे, कोण बाहेरून आलेले आहे, आजारात सुधारणा किती आहे  अशा सर्व गोष्टींचा ट्रॅक ठेवता येणार आहे. गावातील एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते का, त्याला होम क्वारंटाईन करण्याची आवश्यकता आहे का याचीही माहिती मिळणे शक्य होणार आहे. होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीचा ट्रॅक ठेवण्याचाही सुविधा उपलब्ध आहे.  ही सर्व माहिती प्रशासनासाठी उपयुक्त ठरणार आहे. या माहितीचा उपयोग करून प्रशासनाकडून घेतले जाणारे निर्णय, केल्या जाणाऱ्या उपाययोजना याचीही सर्व माहिती ॲग्रोवन ई-ग्राम ॲपद्वारे मिळेल. ही सर्व प्रक्रिया डिजिटली होणार असून त्यासाठी लोकांच्या घरी प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. लॉकडाऊनच्या दरम्यान वैद्यकीय सेवा, किराणा, गॅस अशा अनेक जीवनावश्यक गोष्टींसाठी लोकांना घराबाहेर पडावे लागते. या ॲपमध्ये त्यासाठी एक बटन दिलेले असून त्याद्वारे ग्रामप्रशासनाला माहिती देऊन लोकांना घराबाहेर पडता येईल. ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेला केंद्रस्थानी ठेऊन तयार केलेल्या या ॲपला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायती या ॲपचा वापर करून कोरोनाशी लढा देत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सरपंच आणि स्थानिक प्रशासनाला वेगवेगळ्या अफवांचा सामना करावा लागत होता. तसेच गाव पातळीवर कोरोनाशी लढताना इतरही अनेक अडचणींना सोमोरे जावे लागत होते. ॲग्रोवन ई-ग्राम ॲपच्या माध्यमातून यावर काही तोडगा काढता येईल का, अशी विचारणा होत होती. म्हणून आमच्या टीमने तातडीने काम करून या ॲपमध्ये अनेक नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांचा वापर करून ग्रामीण महाराष्ट्रातील जनता कोरोनाच्या संकटाचा सक्षमपणे सामना करू शकेल. अशा सुविधा देणारे ॲग्रोवन ई- ग्राम हे एकमेव ॲप आहे. - निलेश शेजवळ,   मुख्य कार्यकारी अधिकारी, ॲग्रोवन ॲग्रोटेक      

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT