संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

धुळे, जळगाव जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Chandrakant Jadhav

जळगाव : धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्यामुळे पिके वाया गेली. तसेच रब्बी हंगामही जेमतेम राहील, अशा स्थिती आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी आणि शेतकरी संघटना करत आहेत.

पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणी करावी लागली. त्याचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत. त्यानंतर तिबार पेरणी करूनही फारसा उपयोग झाला नाही. धुळे जिल्ह्यात धुळे व शिंदखेडा तालुक्‍यांत सर्वाधिक बिकट स्थिती होती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला.

पोळा सणाच्या वेळी बरा पाऊस झाला. पण पिके हातची गेल्याचे धुळे तालुक्‍यातील कापडणे येथील शेतकरी आत्माराम पाटील यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात पश्‍चिम पट्ट्यात बेताचाच पाऊस होता. त्यामुळे चाळीसगाव, एरंडोल, पारोळा, पाचोरा, भडगाव या तालुक्‍यांना वरदान ठरणारे बहुळा, मन्याड, भोकरबारी, बोरी, अग्नावती, अंजनी या प्रकल्पांमध्येही फारसा जलसाठा नाही. या भागातही रब्बी हंगाम फारसा बहरणार नाही. पाणीटंचाईचा सामना हिवाळ्यातच करावा लागेल, अशी स्थिती आहे.

हंगामी पैसेवारी फसवी बोदवड, जळगाव, धुळे, शिरपूर, चोपडा, पाचोरा, अमळनेर या भागांतील अनेक गावे हंगामी पैसेवारीत ५० पैशांच्या पुढे दाखविले आहेत. या पैसेवारीमुळे या गावांमध्ये दुष्काळ जाहीर होणार नाही, असे चित्र आहे. परंतु अशा स्थितीमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा करून वस्तुस्थिती समोर मांडण्यासाठी काम करायला हवे, असे आसोदे येथील शेतकरी किशोर चौधरी यांनी म्हटले आहे.

हंगामी पैसेवारी ५० पैशांच्यावर जातेच कशी, हा प्रश्‍न आहे. उडीद, मूग सडले. बाजार समितीत आवक नाही, तुटवडा असताना उडीद, मुगाला भाव नाही. व्यापारी व शासन यांची एकजूट झाली असून, शेतकऱ्यांवर अन्याय सुरू झाला आहे. - कडूअप्पा पाटील, माजी जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

SCROLL FOR NEXT