वाढीच्या अवस्थेतील काजूवर कीडरोगामुळे असे डाग पडले आहेत.
वाढीच्या अवस्थेतील काजूवर कीडरोगामुळे असे डाग पडले आहेत. 
मुख्य बातम्या

ढगाळ हवामानाचा काजू उत्पादनाला फटका

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग : गेल्या आठवड्यात सलग चार दिवस झालेल्या ढगाळ हवामानाचा मोठा फटका कोकणातील काजूला बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अगोदरच उशिरा मोहोर आलेला काजू, वाढीच्या अवस्थेत असताना ढगाळ हवामान निर्माण झाल्याने त्याचा मोठा फटका वाढीच्या अवस्थेतील काजूला बसत आहे. या हवामानामुळे ढेकण्याचा (की मॉस्कीटो), तसेच फुलकिडीचा उपद्रव वाढत आहे. कीडरोग वेळीच आटोक्‍यात न आल्यास काजू खराब होण्याची शक्‍यता असल्याचे तज्ज्ञांचे मत होते.

यंदा कोकणातील काजूची वाटचाल फारशी सुखावह राहिली नाही. माहोर सुटण्याच्या वेळेसच पाऊस, धुक्‍याचे संमिश्र हवामान राहिल्याने मोहोर उशिरा आला. त्यानंतर हवामान स्वच्छ राहिल्याने काजूची वाढ चांगली होत होती, परंतु काजू परिपक्व होत असतानाच कोकणात गेल्या आठवड्यात सातत्याने ढगाळ हवामान राहिले. क्वचित प्रसंगी सूर्यदर्शन झाले. यातच तापमानातही मोठी वाढ झाली. 

उष्ण व ढगाळ हवामानामुळे रोगकिडींचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाली आहे. यामुळे काजू उत्पादकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने काजूवर कीडनाशकांची फवारणी करून काजू बागा वाचवाव्यात, असे आवाहन कृषी विद्यापीठे व शास्त्रज्ञांनी केले आहे.

ढगाळ हवामानामुळे काजूच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन रोगकीड वाढत आहे. यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहून कीडनाशकांची फवारणी करून घ्यावी.  - डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ,  कृषी विस्तार, कृषी विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT