अकोला ः बंदद्वार चर्चा करताना हार्दिक पटेल व रविकांत तुपकर.
अकोला ः बंदद्वार चर्चा करताना हार्दिक पटेल व रविकांत तुपकर. 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही कधीही बोलवा : हार्दिक पटेल

कोजेन्सिस वृत्तसेवा

अकोला : सध्या शेतकरी, तरुण हे सर्वच त्रस्त अाहेत. तुम्ही मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कधीही बोलवा, मी या लढ्यात महाराष्ट्रातही काम करण्यास तयार अाहे. मला देशपातळीवरसुद्धा काही काम करायचे असेल तर सांगा, ती जबाबदारी स्वीकारू, असे अाश्वासन पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान दिले.   शुक्रवारी हार्दिक पटेल यांची अकोल्यात जाहीर सभा झाली. यावेळी स्वाभिमानीचे युवा नेते रविकांत तुपकर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमापूर्वी या दोन तरुण नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी श्री. पटेल यांनी दूरध्वनीवरून खासदार राजू शेट्टींसोबत चर्चा केली.  तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढाईसाठी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असल्याचे सांगितले.

विद्यमान सरकारने कुठलेही अाश्वासन पाळलेले नाही. यामुळे शेतकरी कमालीचा अडचणीत अाहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून दूर झाली याबाबत त्यांनी रविकांत तुपकर व स्वाभिमानी संघटनेचे खास कौतुक केले.

महाराष्ट्रातही गाजवणार सभा गुजरातमध्ये हजारोंच्या सभा गाजवून देशपातळीवर चर्चेत अालेल्या हार्दिक पटेलचे अागामी लक्ष महाराष्ट्रावर अाहे. हार्दिक यापुढील काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावरून मार्गदर्शन करणार अाहे. शुक्रवारी झालेल्या चर्चेत तुपकर यांनी हार्दिक यांना राज्यात सभा घेण्याचे अामंत्रण देताच तुम्ही जेव्हा जेव्हा बोलवाल त्यावेळी राज्यात येईल, असेही पटेल यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT