संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

मोहफुलावरील बंदी उठली

टीम अॅग्रोवन

नागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे महत्त्व लक्षात घेता, शासनाने यावरील संपूर्ण बंदी उठवली असून, याची साठवणूक, वाहतूक, विक्रीसाठी कोणत्याही प्रकारच्या परवान्याची गरज नसेल.  यामुळे आता आदिवासी व्यक्ती स्वत:साठी मोहफुलापासून पारंपरिक पेय तयार करू शकतील. मात्र, याचा लाभ फक्त मागास तालुक्‍यातील आदिवासींना मिळणार आहे. जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजासाठी मोहफूल महत्त्वाचा घटक आहे. मोहफुलांचा आहारात वापर होतो. मात्र, शासनाकडून याच्या वापरावर निर्बंध घातल्याने त्यांचे मोठे नुकसान होत होते. मोहफुलाच्या वापरासाठी वनविभागाकडून जंगलातील लोकांवर कारवाईसुद्धा होती होती. आदिवासी समाजातील लोकांकडून मोहफुलाचा उपयोग आहारात करण्यात येतो. त्यामुळे त्यांच्याकडून मोहफुलाची साठवणूक करण्यात येते. तसेच याची विक्रीही करण्यात येते. मात्र, शासनाकडून याचे वापर आणि विक्रीवर निर्बंध घालण्यात आला होता. तसेच यासाठी  परवान्याचीही अट घातली होती.  शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना पाच किलोपर्यंतचे मोहफूल ठेवता येत होते. त्यानंतर २५ किलोपर्यंतच्या मोहफुलाच्या साठवणुकीसाठी ग्रामपंचायतीची परवानगी आवश्‍यक केली होती. वनाधिकऱ्यांकडूनही त्यांची मुस्कटदाबी होत होती. यामुळे जंगलातील आदिवासी लोकांची मोठी अडचण होत होती. मोहफुलावरून आदिवासी आणि वनाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे मोहफुलावरील निर्बंध उठविण्याची मागणी होत होती.

व्यावसायिक वापर शक्‍य नाही

आदिवासी लोकांची मागणी लक्षात घेता शासनाने मोहफुलावरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे शासनाकडून आदिवासी क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या (शेड्युल्ड एरिया) क्षेत्रात राहणारा व्यक्तीस अमर्याद मोहफुलाची साठवणूक करता येणार असून, त्याची विक्रीही करता येईल. यासाठी कोणत्याही परवान्याची किंवा कुणाच्या मंजुरीची गरज नाही. याचा व्यावसायिक वापर करता येणार नाही. मात्र, मोहफुलांपासून पारंपरिक पेय तयार करता येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

SCROLL FOR NEXT