अकोल्यात तूर, हरभऱ्याचे भाव पाडले
अकोल्यात तूर, हरभऱ्याचे भाव पाडले 
मुख्य बातम्या

अकोल्यात तूर, हरभऱ्याचे भाव पाडले

टीम अॅग्रोवन

अकोला : तूर, हरभऱ्याचे हमीभाव शासनाने जाहीर केले. त्यापेक्षा कमी दरात खरेदी केल्यास कारवाईचा इशारा शासनाने दिला आहे. सध्या खासगी बाजारात सर्रास हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी सुरू आहे. तूर तसेच हरभऱ्याला प्रतिक्‍विंटल तीन हजार ते तीन शंभर रुपये दर दिला जात आहे.

शासनाने तुरीसाठी पाच हजार ४५०; तर हरभऱ्यांसाठी चार हजार २०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यापेक्षा कमीदरात खरेदी करू नये, असे आदेशच दिले. शासनाच्या आदेशानंतरही खासगी बाजारात हमीभावापेक्षा कमी दरात तूर व हरभऱ्याची खरेदी सुरू आहे. जिल्ह्यात गोदामात जागा नसल्याने शासकीय खरेदी जवळपास बंद झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी बाजारात तूर, हरभरा विक्रीसाठी घेऊन जावे लागत आहे.

शेतकऱ्यांच्या याच अडचणीचा फायदा घेत शेतकऱ्यांना आणखी अडचणीत पकडल्या जात आहे. खासगी बाजारात तूर तर पार कोसळले आहे. साडेपाच हजारांवरून तीन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर खाली आले. अशीच स्थिती हरभऱ्याची आहे. शासनाने हरभऱ्याची दर चार हजार २०० व बोनस असे चार हजार ४०० रुपये जाहीर केले. मात्र, नाफेडची खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांची अडवणूक सुरू आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT