संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

जळगावमधून परदेश अभ्यास दौऱ्यासाठी ९३ शेतकऱ्यांचे अर्ज

Chandrakant Jadhav

जळगाव : राज्य शासनाच्या कृषी विभागार्फे राबविण्यात येत असलेल्या परदेश शेती अभ्यास दौऱ्यासाठी एकूण ९३ अर्ज प्राप्त झाले आहेत. छाननी अद्याप सुरू झालेली नाही. परंतु एवढ्या शेतकऱ्यांचा समावेश या अभ्यास दौऱ्यासाठी करून घेणे शक्‍य नाही. दौऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या निवडीचा अंतिम निर्णय वरिष्ठ कार्यालयातर्फे घेतला जाईल, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे.

कृषी विभागातर्फे शेती, जोडधंडे व शेती प्रक्रिया उद्योगांबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांना मार्गदर्शन  मिळावे यासाठी कृषी आयुक्‍तालयाच्या सूचनेनुसार शेती परदेश अभ्यास दौरा आयोजित येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.

शेतकऱ्यांना इस्त्राईल, जर्मनी, नेदरलॅण्ड आणि ऑस्ट्रेलिया येथे दुग्ध, फळ, भाजीपाला शेती, प्रक्रिया उद्योग यासंबंधीची माहिती मिळावी यासाठी पाठविले जाणार आहे. दौरा कधी निघेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तत्पूर्वी प्राप्त अर्जांची छाननी होईल. ही प्रक्रिया कृषी विभागामध्येच पार पाडली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

परदेश अभ्यास दौऱ्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना निम्मा खर्च करावा लागेल. इस्त्राईल दौऱ्यासाठी प्रतिव्यक्ती एक लाख दोन हजार ९९८ रुपये एकूण खर्च अपेक्षित आहे.

जर्मनी व नेदर्लंड दौऱ्यासाठी एक लाख २७ हजार ६१९ रुपये एकूण खर्च लागेल. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दोन लाख ४३ हजार १६७ रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील निम्मा खर्च शेतकऱ्यांना करायचा आहे.

दौऱ्यासाठी 'फिल्डिंग'ची चर्चा दौऱ्यात आपल्याला सहभागी करून घेतले जावे यासाठी अनेक शेतकरी राजकीय व्यक्तींचा आधार घेऊन फिल्डिंग लावत आहेत. परंतु निकषानुसार किमान २५ व कमाल ६० वर्षे वय असलेल्या पासपोर्टधारक शेतकऱ्यालाच दौऱ्यात सहभागाची संधी मिळेल. तसेच शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थेत कार्यरत व्यक्तीला दौऱ्यात सहभागी होता येणार नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

SCROLL FOR NEXT