पत्रकारांना प्रदर्शनाबाबत माहिती देताना कुलगुरू डॉ. विलास भाले, शेजारी डॉ. मानकर, डॉ. खर्चे, डॉ. कडू .
पत्रकारांना प्रदर्शनाबाबत माहिती देताना कुलगुरू डॉ. विलास भाले, शेजारी डॉ. मानकर, डॉ. खर्चे, डॉ. कडू . 
मुख्य बातम्या

अकोल्यात अाजपासून ‘पंदेकृवि’चे ॲग्रोटेक कृषी प्रदर्शन

टीम अॅग्रोवन

अकोला : कृषिक्रांतीचे प्रणेते, स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ११९व्या जयंतीनिमित्त बुधवार (ता.२७) ते शुक्रवार (ता.२९) या काळात कृषी प्रदर्शन अायोजित करण्यात अाले. बुधवारी राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन होईल, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डाॅ. विलास भाले यांनी पत्रकारांना दिली.

यावर्षीचे हे प्रदर्शन ‘कीड संरक्षण व सेंद्रिय शेतीवर भर’ या थीमवर अाधारलेले असून शेतकऱ्यांना काळानुरूप माहिती देणारे ठरले, असा विश्वास डॉ. भाले यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर, रजिष्टार डॉ. कडू उपस्थित होते. या वेळी डॉ. भाले यांनी विद्यापीठाच्या कार्याचा सविस्तर अाढावा सादर केला.

विद्यापिठाच्या क्रीडांगणावर होत असलेल्या या प्रदर्शनामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले विविध पिक वाण, तांत्रिक शिफारशी, पीकनिहाय तंत्रज्ञान, लागवडीपासून तर बाजारपेठेपर्यंत लागणारे शेती अवजारे, यंत्र पाहण्यास उपलब्ध राहणार अाहेत. या वर्षी २० प्रयोगशील शेतकऱ्यांना स्वतःची माहिती देण्याची संधी देण्यात अाली अाहे.

सकाळी ११ वाजता कृषिमंत्री फुंडकर यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील. तर कुलगुरू डॉ. विलास भाले अध्यक्ष असतील.

मोबाईल ॲपचे होणार उदघाटन शेतकऱ्यांना विविध पिकात तणनियंत्रण करावे लागते. या बाबत माहिती देण्यासाठी एक मोबाईल ॲप बनविण्यात अाले असून, त्याचे बुधवारी कृषिमंत्री फुंडकर यांच्या हस्ते उदघाटन केले जाणार अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT