Agronomists interact with farmers through video conferencing
Agronomists interact with farmers through video conferencing 
मुख्य बातम्या

कृषीशास्त्रज्ञांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे शेतकऱ्यांशी संवाद 

टीम अॅग्रोवन

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी विस्तार कृषी केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन पीक, कीड, रोग, पाणी व्यवस्थापन आदी बाबत सल्ला देतात. परंतु ‘कोरोना’ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन सुरू असल्यामुळे शेतावर जाण्यासाठी मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे बुधवारी (ता. ८) सकळी ११ ते १२ या वेळेत कृषी विद्यापीठातील कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रातून झूम क्लाउड मिटिंग या मोबाईल अॅपव्दारे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. 

कृषी विद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रवीण कापसे, डॉ. शंकर पुरी, डॉ. आनंद दौंडे, डॉ. डी. डी. पटाईत आदी शास्त्रज्ञ व्हिडिओ यामध्ये सहभागी झाले होते. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत विविध पिकांची परिस्थिती जाणून घेतली. येत्या खरीप हंगामात कीड, रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकांचे फेरपालट आवश्यक असल्याचा सल्ला दिला. 

शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकाचे समाधान केले. या व्हिडिओ बैठकीमध्ये परभणी, उस्मानाबाद, बीड, वाशिम आदी जिल्ह्यातील २० ते २५ शेतकरी सहभागी झाले होते. या पुढील काळात शेतकऱ्यांशी आठवड्यातील एक किंवा दोन दिवस ऑनलाइन संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे. 

सोमवारी (ता. १३) सकाळी ११ ते १२ या वेळेत फळबाग व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांची ऑनलाइन संवाद साधला जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. ऑनलाइन बैठकीचा आयडी आणि पासवर्ड रविवारी (ता. १२) पाठविण्यात येईल, असे डॉ. आळसे यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT