कृषी सेवा केंद्र संचालकांनी अद्ययावत राहावे ः डॉ. मनोहरे
कृषी सेवा केंद्र संचालकांनी अद्ययावत राहावे ः डॉ. मनोहरे 
मुख्य बातम्या

कृषी सेवा केंद्र संचालकांनी अद्ययावत राहावे ः डॉ. मनोहरे

टीम अॅग्रोवन

चंद्रपूर ः शेतकऱ्यांचा पहिला मार्गदर्शक कृषी सेवा केंद्र संचालक असतो. त्यामुळे त्यांनी सतत अद्ययावत राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आत्मा प्रकल्प उपसंचालक डॉ. रवींद्र मनोहरे यांनी केले.

मॅनेज हैदराबाद, वनामती नागपूर, आत्मा चंद्रपूर आणि कृषी विज्ञान केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्‍त सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या कृषी विस्तार सेवा निविष्ठा विक्रेत्यांकरिता पदविका अभ्यासक्रमाचे उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. धान संशोधन केंद्र सिंदेवाहीच्या संशोधन संचालक डॉ. उषा डोंगरवार, केव्हीके कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जी. नागदेवते, डॉ. विजय सिडाम यांची या वेळी उपस्थिती होती. डॉ. सिडाम यांनी प्रास्ताविकातून अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टाची माहिती दिली. 

कृषी निविष्ठा विक्रेत्यांपर्यंत परिपूर्ण कृषी तंत्रज्ञान पोचावे, पीक पद्धती व त्यावर येणारे किडरोग याचे शास्त्रोक्‍त आकलन होण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम असल्याचे या वेळी सांगण्यात आले. उषा डोंगरवार यांनी विविध पिकांचे खत व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. विद्यापीठाव्दारे विकसित तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. 

या वेळी प्रा. पी. पी. देशपांडे, डॉ. सोनाली लोखंडे, के. जी. मांडवडे, प्रा. एस. आर. वेलादी, आत्मा कार्यालयाचे धानुरकर, रवींद्र कन्नाके, विशाल घागी, अमीत हातझाडे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सोनाली लोखंडे यांनी केले. पी. पी. देशपांडे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT