कृषी पर्यटन
कृषी पर्यटन 
मुख्य बातम्या

कृषी पर्यटनाला मिळणार जुन्नर तालुक्यात चालना

टीम अॅग्रोवन

पुणे: आैद्याेगिक विकासाला मर्यादा असल्याने राेजगार निर्मितीसाठी नैसर्गिक संसाधनांचा वापरातून विकास करण्यासाठी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जुन्नर तालुक्‍याला विशेष पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे. या पर्यटन विकासामध्ये कृषी पर्यटनालादेखील चालना देण्यात येणार असून शेतकऱ्यांसाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे.  जुन्नर तालुक्‍याची पर्यटनाच्या दृष्टीने अनेक नैसर्गिक, एेतिहासिक आणि धार्मिक संसाधने उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यासह निसर्गसौंदर्याने नटलेले सात किल्ले, बौद्धकालीन ३५० लेण्यांसह एेतिहासिक, धार्मिक, पर्यटन, भौगोलिक महत्त्व असलेले स्थळे आहेत. याशिवाय नारायणगाव येथील तमाशा पंढरी, कृषी पर्यटन केंद्रे, आशियातील सर्वांत पहिली वायनरी, बिबट निवारण केंद्र आदींस्थळेही अाहेत.  ऐतिहासिक, नैसर्गिक व पारंपरिक वारसा लाभलेला जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्र घोषित करण्याची विनंती सरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. येथील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही पर्यटन विभागामार्फत करण्यात येणार आहे.

  •    राज्यातील पहिला पर्यटन तालुका
  •    छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जन्मभूमी
  •    बौद्धकालीन सर्वाधिक ३५० लेण्या
  •    अष्टविनायकांपैकी लेण्याद्री व ओझर ही देवस्थाने
  •    नाणे, दाऱ्या व अणे घाट
  •    खोडद येथे जागतिक महादुर्बीण
  •    गिर्यारोहनासाठी किल्ल्यांची शृंखला
  •    जलक्रीडा पर्यटनासाठी धरणांची शृंखला
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT