license
license 
मुख्य बातम्या

कोल्हापुरात व्हाट्सॲपवरून शेतमाल वाहतुकीचा परवाना 

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर: कोरोनाच्या संचारबंदीमुळे निर्माण झालेली शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा व्हाट्सअप नंबर बिझी राहणार आहे. कोल्हापूरचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्या व्हाट्सअप वर शेतमाल वाहतूक किंवा अन्य कृषी विषयक कामाबाबत परवाना मिळवण्यासाठी अर्ज केल्यास तातडीने त्यांना परवाना देण्यात येत आहे. शेतकऱ्याला किंवा शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनधारकाला थेट त्याच्या व्हाट्सॲप नंबर वरच परवाना पाठवून दिला जातो. गेल्या दोन दिवसात सुमारे ७० परवाने ऑनलाईन देण्यात आले आहेत.  जिल्हा प्रशासनाने विभागवार समित्या करून संबंधित अधिकाऱ्यांना परवान्याचे अधिकार दिले आहेत. भाजीपाला फळे खते बियाणे, कृषिजन्य वस्तू, जीवनावश्यक वस्तू आदींची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी श्री. वाकुरे यांना याबाबतचे परवाने देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये शेतमाल वाहतुकीची अडचण येत आहे. परवाना नसल्याने त्यांना अनेक ठिकाणी अडवणूक होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी श्री. वाकुरे यांनी ऑनलाइन परवाने तातडीने देण्याचा उपक्रम सुरू केला. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  ज्या शेतकऱ्यांना अथवा वाहनधारकांना शेतमालाची वाहतूक करायचे आहे. त्याने एका कागदावर अर्ज लिहून त्याचा फोटो वाकुरे यांच्या व्हाट्सॲप क्रमांकावर पाठवून द्यावा दिला जातो. सायंकाळी सहा वाजेपर्यंत येणारे अर्ज एकत्र करून परवाने तयार केले जातात, व संबंधित शेतकरी व वाहनधारकांना ते व्हाट्सअप वर पाठवले जातात. ज्यांना कार्यालयात येऊन प्रत्यक्ष परवाने शक्य नाहीत, त्यांनी प्रिंट काढून सोबत बाळगल्यास या वाहतुकीला कोणतेही अडथळे येणार नाहीत, अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT